Wednesday, February 1, 2023
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्नेहल प्रतिष्ठान यंदाही करणार समाज प्रबोधन, ७ दिवस शिवपुराण, सुंदरकांड, प्रवचनाचे आयोजन!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/08/2022
in विशेष
Reading Time: 1 min read
स्नेहल प्रतिष्ठान यंदाही करणार समाज प्रबोधन, ७ दिवस शिवपुराण, सुंदरकांड, प्रवचनाचे आयोजन!

पिंप्राळ्याच्या राजाचा वाढता नावलौकिक, लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव, दि.३१ – गणेशोत्सव खऱ्या अर्थाने समाजासाठी साजरा करायचा उत्सव आहे. जळगाव शहरातील पिंप्राळ्याचा राजा स्नेहल प्रतिष्ठानतर्फे २१ वर्षाची परंपरा अबाधित राखत यंदा देखील विविध समाज प्रबोधनात्मक उपक्रम साजरे केले जाणार आहे. सलग ७ दिवस दररोज दुपारपासून संगीतमय श्री शिव महापुराण, संगीतमय सुंदरकांड आणि नामांकित किर्तनकारांचे प्रवचन, कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. समस्त जळगावकर भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन स्नेहल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजिंक्य देसाई यांनी केले आहे.

https://satymevjayate.com/wp-content/uploads/2021/07/Kantai_-Netralaya_AD.mp4

पिंप्राळा येथील आर.एल.कॉलनीतील स्नेहल प्रतिष्ठानचे यंदाचे २१ वे वर्ष आहे. दरवर्षी आगळीवेगळी परंपरा जपणाऱ्या स्नेहल प्रतिष्ठानतर्फे यंदा देखील ७ दिवस विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१ सप्टेंबरपासून ह.भ.प. गौप्रेमी गजानन महाराज वरसाडेकर यांची दुपारी २ ते ५ श्री शिव महापुराण कथा होणार आहे. कार्यक्रमांसाठी भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला असून भाविकांसाठी पंख्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. दि.३१ रोजी दुपारी ३ पासून श्रींचा आगमन सोहळा सुरू होणार आहे.

दि.१ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून सालासर भक्त मंडळाचे संगीतमय सुंदरकांड, दि.२ रोजी बाल कीर्तनकार चैतन्य महाराज राऊत, आळंदीकर यांचे कीर्तन, दि.३ रोजी हभप साध्वी दुर्गादीदी महाराज बिडकीनकर, दि.४ रोजी हभप ज्ञानेश्वर माउली महाराज वाबळे आळंदीकर, दि.५ रोजी हभप धनश्रीताई महाराज भडगावकर, दि.६ रोजी हभप गंगाराम महाराज राऊत पैठणकर, दि.७ रोजी हभप गौप्रेमी गजाननजी महाराज वरसाडेकर यांचे कीर्तन, प्रवचन दररोज रात्री ८ वाजता होणार आहे.

स्नेहल प्रतिष्ठानतर्फे भाविकांसाठी योग्य व्यवस्था आणि नियोजन करण्यात आले असल्याने पावसामुळे कोणताही कार्यक्रम रद्द होणार नाही. सलग ९ वर्षापासून समाज प्रबोधनात्मक उपक्रमाचे आयोजन करणारे जळगाव जिल्ह्यातील स्नेहल प्रतिष्ठान हे एकमेव मंडळ आहे. मंडळाचा पिंप्राळ्याचा राजा म्हणून नावलौकिक दिवसेंदिवस वाढत असून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. जळगाव शहरातील मुख्य सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत पिंप्राळा परिसरातून सहभागी होत असलेले स्नेहल प्रतिष्ठान हे एकमेव मंडळ आहे. दि.९ रोजी दुपारी १ वाजेपासून भव्य विसर्जन सोहळा आणि मुख्य सार्वजनिक मिरवणूक काढली जाणार आहे. संपूर्ण उपक्रमांसाठी स्नेहल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजिंक्य देसाई यांच्यासह सर्व सदस्य, मार्गदर्शक आणि सहकारी परिश्रम घेत आहेत. समस्त जळगावकर नागरिकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भानखेडा, विचवा शाळेतून अंतर्नादच्या ‘एक दुर्वा समर्पणाच्या’ उपक्रमास सुरुवात

Next Post

मुस्लिम विद्यार्थी, पालक आणि काका मूर्तीकाराने दिली शाळेला गणेशाची मूर्ती

Next Post
मुस्लिम विद्यार्थी, पालक आणि काका मूर्तीकाराने दिली शाळेला गणेशाची मूर्ती

मुस्लिम विद्यार्थी, पालक आणि काका मूर्तीकाराने दिली शाळेला गणेशाची मूर्ती

वाढदिवस शुभेच्छा जाहिरात…

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

आई हॉस्पिटल, यावल

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावात प्रथमच प्रेरक वक्ते स्वामी ज्ञानवत्सलदास यांचे थिंक डिफरेन्ट, बी डिफरेन्ट, सकसिड डिफरेन्ट या विषयावर २ फेब्रुवारी रोजी व्याख्यानाचे आयोजन

जळगावात प्रथमच प्रेरक वक्ते स्वामी ज्ञानवत्सलदास यांचे थिंक डिफरेन्ट, बी डिफरेन्ट, सकसिड डिफरेन्ट या विषयावर २ फेब्रुवारी रोजी व्याख्यानाचे आयोजन

मणियार विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबिराचे उद्घाटन

मणियार विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबिराचे उद्घाटन

किल्ल्यांचा अभ्यास व्यक्तिमत्त्वाचा विकास या विषयावरची कार्यशाळा झांबरे विद्यालयात संपन्न

किल्ल्यांचा अभ्यास व्यक्तिमत्त्वाचा विकास या विषयावरची कार्यशाळा झांबरे विद्यालयात संपन्न

समाजकार्य विभागाच्या विद्यार्थांनी पथनाट्याच्या माध्यमातून केली जिल्ह्यात मतदार जनजागृती

समाजकार्य विभागाच्या विद्यार्थांनी पथनाट्याच्या माध्यमातून केली जिल्ह्यात मतदार जनजागृती

३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धेत पुणे अव्वल

३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धेत पुणे अव्वल

काव्यरत्नावली चौक उजळला…

https://satymevjayate.com/wp-content/uploads/2022/10/VID-20221026-WA0000.mp4

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

जाहिरात

TITAN HOSPITAL JALGAON

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

https://satymevjayate.com/wp-content/uploads/2021/06/गांधी-तीर्थ-जैन-इरिगेशन-.mp4

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

कोरोना संदेश

जाहिरात

जाहिरात

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

सत्यमेव जयते न्युज दिनदर्शिका – २०२२

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

सत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.
%d bloggers like this: