<
चोपडा शहराचा ४ सप्टेंबर रविवार रोजीचा आठवडे बाजार बंद असण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज आदेश काढले आहे. दरम्यान कार्यकारी दंडाधिकारो चोपडा यांनी दिनांक १ सप्टेंबर २०२२ रोजीच्या पत्रान्वये सदर आदेश देण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या निर्देशात म्हटले आहे की,दिनांक ४ वार रविवार रोजी सार्वजनिक गणेश उत्सवाचे विसर्जनाची मिरवणूक असल्याने चोपडा शहराचा आठवडे बाजार असून दिनांक दि. 04/09/2022 (रविवार) या दिवशी गणपती विसर्जनाचा मार्ग हा बाजार रस्ता असल्याने सदर दिवशी आठवडे बाजाराची व भाविकांची गर्दी होईल त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने दिनांक 04/09/2022 रोजी आठवडे बाजार हा बंद ठेवण्याची परवानगी मिळणेबाबत विनंती केलेली आहे. त्याअर्थी मी. अभिजीत राऊत, जिल्हादंडाधिकारी जळगांव मुंबई मार्केट अॅण्ड फेअर्स अॅक्ट 1862 चे कलम 5 (अ) व (क) अन्वये मला प्रदान करण्यांत आलेल्या अधिकाराचा वापर करुन मी चोपडा शहरात दिनांक 04/09/2022 रोजी श्री गणेश विसर्जन होत असल्याने सदर दिवशी भरणारा आठवडे बाजार हा इतर सोयीच्या दिवशी भरवण्यास याद्वारे मंजूरी देत आहे.
कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकरीता तसेच दिनांक 09/09/20022 रोजी जळगांव शहर व जळगांव जिल्हयाच्या इतर ठिकाणी आठवडे बाजार भरणार असल्यास सदरचा बाजार इतर सोयीच्या दिवशी भरवण्यास याद्वारे मंजुरी देत आहे.