<
ईश्वर खरे लोहारा ता. पाचोरा . (रिपोर्टर) धी शेंदुर्णी सेकं एज्यु को ऑप सोसा द्वारा संचलित डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा तालुका पाचोरा विद्यालयास दिनांक 2 /9 /2022 वार शुक्रवार रोजी माध्यमिक विद्यालय शिंदाड ता पाचोरा येथे झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते आठवी गटातून विद्यालयास प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले प्रकल्पाचा विषय होता पर्यावरण आणि आरोग्य कु साक्षी क्षीरसागर कु योगेश्वरी चौधरी या विद्यार्थिनींनी हे प्रकल्प तयार केले होते त्यांना विद्यालयातील श्री एस बी सावकारे श्री पी एम पाटील श्री एन व्ही बोरसे श्री आर जी बैरागी श्री व्ही एम शिरपुरे श्री जे आर भालेराव श्री ए एम तडवी या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थिनींचे व शिक्षकांचे कौतुक शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री संजयरावजी गरुड सचिव श्री सतीश चंद्रजी काशीद महिला संचालिका सौ उज्वलाताई काशीद सहसचिव श्री दिपकभाऊ गरुड वस्तीगृह सचिव श्री कैलासभाऊ देशमुख संस्थेचे जेष्ठ संचालक श्री आबासाहेब भिमराव शामराव शेळके विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री अ अ पटेल, सरपंच अक्षयकुमार जैस्वाल, उपसरपंच आबा चौधरी, ग्रा. पं. सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष अमृत चौधरी, विकासो. चैरमन. शरद आण्णा सोनार, संचालक मंडळ शिक्षण प्रेमी, पत्रकार बंधू विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर एस परदेशी पर्यवेक्षिका सौ यु डी शेळके जेष्ठ शिक्षक श्री पी एम सुर्वे श्री एस एस गुजर आर सी जाधव वाय पी वानखेडे आर के सुरवाडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी व यशस्वी विद्यार्थिनींच्या पालकांनी त्यांचे कौतुक केले आहे.