<
तालुका कृषी अधिकारी कार्यालय भुसावळ यांचेमार्फत माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत आज ग्रामपंचायत कार्यालय मांडवेदिगर येथे गोंड बंजारा आदिवासी गावातील शेतकरी बांधवांना कृषी विभागातील विविध योजना PMFME, HORTNET, GI मानांकन, सुरक्षित फवारणी, MREGS बाबत मार्गदर्शन करण्यात आले. मा तालुका कृषी अधिकारी श्री अभिनव माळी यांनी शेतकऱ्यांनी तात्काळ PM kisan योजनेचे E-kyc करण्या बाबत शेतकऱ्यांना आव्हाहन केले. तसेच शेतकऱ्यांना त्याठिकाणी विविध योजनांचे कोरे अर्जाचे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले. DRP सौ. मनिषा पाचपोळ यांनी PMFME योजनेबद्दल मार्गदर्शीत करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा. आमदार श्री संजय सावकारे साहेब यांनी भुसावळ औद्योगिक तालुक्यात PMFME योजनेचा लाभ घेऊन आपले स्वतःचे व्यवसाय उभारावे असे शेतकऱ्यांना आवाहन केले. विशेष अतिथी म्हणून मा. विकृससं. नाशिक कार्यालयाचे तंत्र अधिकारी श्री उल्हास ठाकूर, साहेब व प्रमुख पाहुणे म्हणून मा उपसरपंच सौ. बाऊलीबाई पवार, भाजपा तालुकाध्यक्ष श्री भालचंद्र पाटील तर मार्गदर्शक केव्हीके ममुराबाद चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ हेमंत बाहेती उपस्थित होते.
यावेळी PMFMS योजनांचे पोस्टर व गुलाबी बोंडअळीची नियंत्रण घडीपत्रिकेचे विमोचन अनुक्रमे मा. आ. श्री संजय सावकारे आणि मा श्री उल्हास ठाकूर यांचे शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमानंतर श्री कबीर पवार यांचे शेतावरील मुग आंतरपिक कापूस प्रक्षेत्रात मान्यवर व शेतकऱ्यांनी उपस्थिती देऊन फेरोमन ट्रॅप ची उपयुक्तता समजून घेऊन ट्रॅप मध्ये अडकलेल्या पतंगाची मा. श्री सावकारे यांनी पाहणी केली.
डॉ बाहेती यांनी कापूस पिकांवरील विविध हानीकारक किडीची ओळख करून देऊन त्यांची प्रभावी नियंत्रण तर मा श्री उल्हास ठाकूर साहेबांनी मित्रकिडींची ओळख करून त्यांचे कार्य विषयी माहिती सांगितली. आणि मा श्री अभिनव माळी यांनी कापूस पिकांचे योग्य खत व्यवस्थापन विषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शीत केले. यावेळी मांडवेदिगर व भिलमळी येथील ग्रामपंचायत सदस्य श्री कबीर पवार, भोजमल पवार, शेतकरी गटाचे व महिला बचत गट सदस्य, ग्रामसेवक, पोलिस पाटील श्री रमेश पवार, जेष्ठ शेतकरी श्री बिरबल पवार, प्रेमराज पवार, ताराचंद पवार, गोविंद पवार, विजय पवार, अमर पवार, संजय राठोड, सुरेश जाधव व मोठय़ा प्रमाणावर शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद तसेच वसंतराव नाईक कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री गोरलाल दरबार जाधव व सदस्य यांनी परिश्रम घेतले.