भडगाव-(प्रतिनिधी) – आज दि. 5 सप्टेंबर 2022 शिक्षक दिन. सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय व सौ. ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय या विद्यालयात आज शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याचा परिचय उपमुख्याध्यापक श्री. के. एस. पाटील यांनी करून दिला. तर गुरुचे आपल्या जीवनातील महत्त्व याबद्दल ज्येष्ठ शिक्षिका सौ. हेमलता पाटील यांनी विचार मांडले.
विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला. भेटवस्तू प्रदान केल्या. तसेच सकाळ व दुपार सत्रातील विद्यार्थ्यांनी वर्गांमध्ये अध्यापनाचे कार्य केले. काही विद्यार्थ्यांनी शिपाई काकांची भूमिका पार पाडली.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य/ मुख्याध्यापक श्री विश्वासराव साळुंखे, सकाळ सत्राचे पर्यवेक्षक श्री. एस. एम. पाटील, उपप्राचार्य श्री संदीप सोनवणे, प्रभारी पर्यवेक्षक श्री शरद महाजन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू- भगिनी उपस्थित होते.