
पाचोरा – (प्रतिनिधी) – तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल मधुकरराव देशमुख यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी मानव्य विद्याशाखेअंतर्गत मराठी विषयात पीएच.डी. (आचार्य) पदवीसाठी मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे. डॉ. अतुल देशमुख यांचे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधपत्रिका तसेच परिषदांमध्ये शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
त्यांची ‘संक्षिप्त मध्ययुगीन मराठी वाड्मयाचा इतिहास’ व ‘मध्ययुगीन मराठी वाड्मयाचा स्थूल इतिहास’ अशी दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत तर तीन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. त्यांच्या या यशाबद्दल पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, मानद सचिव ॲड. महेश देशमुख, व्हाईस चेअरमन व्ही.टी.जोशी, ज्येष्ठ संचालक नानासाहेब देशमुख, सर्व संचालक, प्राचार्य डॉ. एन.एन. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. एस. आर. पाटील, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.