<
साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले
भुसावळ – (प्रतिनिधी-) अंतर्नाद प्रतिष्ठानने शहरात सालाबादाप्रमाणे गणरायाला एक दुर्वा समर्पणाची उपक्रम राबविला.यंदा उपक्रमाचे सहावे वर्ष होते.चार शाळेतील २२४ विद्यार्थ्यांना मदतीचा हात या उपक्रमातून देण्यात आला.गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करुन दात्यांनी स्वेच्छेने दिलेल्या मदतीतुन गोरगरीब विद्दार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.त्यात बालमित्र पुस्तक,पाटी,पेंसील,वह्या,पेन,पाटी पेन्सील समावेश आहे.
निरंतर चार शाळेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचा समारोप जिल्हा परिषद शाळा कठोरे प्र तालुका यावल येथील शाळेत करण्यात आला.उपक्रमाची सुरुवात बोदवड तालुक्यातील भानखेडा जिप शाळा येथून झाली, त्यात नंतर विचवा जिप शाळा बोदवड, यावल तालुक्यातील जि.प. वनोली या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि संत गाडगेबाबा यांनी दाखवलेल्या मार्गाने अंतर्नाद वाटचाल सुरु आहे.भविष्यात ह्या शैक्षणिक चळवळीला व्यापक स्वरुप यावे अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.वनोली येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी हे होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप तालुका सरचिटणीस विलास चौधरी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय चौधरी, ग्रा.प. सदस्य कैलास पाटील, मुख्याध्यापक कुंदन वायकोळे हे होते. कठोरे येथील कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रा.प.सदस्य प्रतिभा कोळी या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शा.व्य.स. सदस्य नारायण कोळी, मुख्यध्यापक कमलेश नेहते हे होते.
सूत्रसंचालन जीवन महाजन यांनी केले. प्रस्तावित प्रकल्प प्रमुख समाधान जाधव यांनी तर अंतर्नादच्या उपक्रमाविषयी प्रकल्प सह समन्वयक देव सरकटे यांनी माहिती दिली.आभार समन्वयक ज्ञानेश्वर घुले यांनी मानले.या प्रसंगी शिक्षक सुरेखा सैंदाणे, भावना इंगळे, तेजेंद्र महाजन, अमित चौधरी, भूषण झोपे, परेश सपकाळे, सचिन पाटील, कपिल पाटील, दीपक पाटील, अन्न पूर्णा महिला बचत गट सदस्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दातृत्वाच्या दिंडीचे वारकरी
उपक्रमास रघुनाथ सोनवणे, ललित पाटील, पदमजा राऊत, अमोल पालवे, सचिन पाचपांडे, किशोर पाटील, अनिल देशपांडे, अलका देवगिरीकर, अशोक बाऱ्हे, भूषण कोटेचा, किरण पाटील, योगेश सूर्यवंशी, निलेश वाणी यांनी सहकार्य केले.
सण उत्सवांना दिशादायक उपक्रम
सण उत्सवाना सामाजीक उपक्रमांची जोड देउन राबविण्यात आलेला उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आणि समाजाला दिशा देणारा असाच आहे. दात्यांच्या मदतीच्या माध्यमातून गरीब गरजवंत विध्यार्थी यांची शैक्षणिक साहित्याची गरज भागत आहे.सण उत्सव विधायक उपक्रमांनी साजरा करणे हा दिशादायक उपक्रम आहे अश्या भावना हिरालाल चौधरी यांनी व्यक्त केल्या.
समाजाने उपक्रमास बाळ द्यावे
अंतर्नादने सामाजिक भान जपून एक दुर्वा समर्पणाची हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यात समाजातील जास्तीत जास्त घटकांनी सहभागी हाेऊन उपक्रमास बळ देणे अपेक्षित आहे. उपेक्षित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असे उपक्रम निश्चितच पुरक ठरतील असे सह समन्वयक देव सरकटे यांनी नमूद केले.
भविष्यात व्यापक स्वरूप
एक दुर्वाच्या माध्यमातून गरिब आणि गरजवंत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज भागविता आली याचे फार मोठे समाधान आहे.भविष्यात गरीब आणि गरजवंत विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाला अजुन व्यापक स्वरुप देउ असे अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी नमूद केले.