<
जळगाव-(प्रतिनिधी)- केसीई सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय व ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमचे अध्यक्ष केसीई सोसायटी चे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, नाट्यशास्त्र विभागाचे हेमंत पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
अब्राहम लिंकन , आर्मी ऑफिसर , देणाऱ्याने देत जावे , स्त्री मनाचा आवाज , ब्रेकिंग न्युज , माझा दादा , मुक्ताई , तैफियत , बोलकी अशा विविध विषयांवर आधारित मनमोहक व सामाजिक प्रश्नावर प्रकाश टाकणाऱ्या सुंदर नाट्यछटा स्पर्धेत सादर करण्यात आल्या.स्पर्धेत जळगाव शहराच्या 15 शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प.वि.पाटील विद्यालयाच्या मुख्या.रेखा पाटील यांनी केले तर आभार ए. टी. झांबरे विद्यालयाचे मुख्या.डी. व्ही.चौधरी यांनी मानले.
स्पर्धेत पहिल्या गटात प्रथम -कल्याणी कुलकर्णी ( अविनाश आचार्य विद्या), द्वितीय -सार्थक कोठावदे ( अविनाश आचार्य विद्या) ,तृतीय -पूर्वा पिंपळे( गुरुवर्य प.वि.पाटील) , उत्तेजनार्थ – संस्कृती पवनीकर (विवेकानंद इंग्लिश मेडिअम) व तारका महाजन ( गुरुवर्य प.वि.पाटील) . द्वितीय गटात प्रथम – माधुरी पाटील( गी.न.चांदसरकर) , द्वितीय – सृष्टी कुलकर्णी (प.न.लुंकड) , तृतीय – वेदिका बखाल (भगीरथ इंग्लिश स्कुल) , उत्तेजनार्थ – नादिनी चौधरी (का.उ.कोल्हे) व स्मित ठाकरे (भगीरथ इंग्लिश स्कुल) , तृतीय गटात देवयानी नाईक (प.न.लुंकड) , द्वितीय – नंदिनी सावंत ( भगीरथ इंग्लिश) , तृतीय -श्रुती शिंपी (नंदिनीबाई ) , उत्तेजनार्थ – तनय महाजन -( आर.आर.विद्यालय) सोनल कोंडाळकर ( विद्या विकास) सर्व यशस्वी विद्यार्थ्याना शालेय शिक्षण समन्वयक के.जी.फेगडे , चंद्रकांत भंडारी , प्रसाद देसाई आदींच्या हस्ते स्मृतिचिन्ह ,रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप केदार सरला पाटील ,सी.बी.कोळी , सतीश भोळे, योगेश भालेराव , आर.एन.तडवी ,प्रणिता झांबरे , इंदू चौधरी , स्वाती पाटील ,सुधीर वाणी आदीं.