<
जळगांव प्लॉगर्स व रायसोनी कॉलेज चे संयुक्त विद्यमानाने स्वच्छता मोहीम संपन्न
जळगाव – (प्रतिनिधी) – जळगाव प्लॉगर्स म्हणजे जळगाव शहरातील तरुण तरुणीनी एकत्र येऊन जळगाव शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवून जळगाव शहरला परत एकदा स्वच्छ, सुंदर आणि हरित ओळख मिळवून देण्याची चळवळ आहे. या कामात लहान मुलांपासून तर ज्येष्ठ पर्यंत सर्वांचा सहभाग असतो.जळगाव प्लॉगर्स दर रविवारी सकाळी ६:३० ते ८:३० या वेळात शहरातील मेहरून तलाव आणि विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवत असतात. त्यांनी आतापर्यंत 25 स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ जळगाव साठी हातभार लावला आहे.
जळगाव शहरातील बहुतांशरित्या गणेश विसर्जन हे मेहरून तलावात होत असून यामुळे मोठ्या प्रमाणात निर्मल्य तलावात फेकले जाते आणि तलाव प्रदूषित होतो. यामुळेच शनिवारी म्हणजेच १० सप्टेंबर रोजी जळगाव प्लॉगरस व रायसोनी कॉलेजच्या रोट्रॅक्ट क्लब यांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणात तलाव स्वच्छता मोहीम राबवण्यात आली व या मोहिमेला जळगाव महानगरपालिकेचा मोठा हातभार लागला असून मेहरून तलाव परिसरातील गणेश घाट येथे ही मोहीम संपन्न झाली.
या मोहिमेत शंभरहून अधिक स्वयंसेवकांनी हातभार लावला. मानवी साखळी तयार करत अनोख्या पद्धतीने स्वयंसेवकांनी तलाव काठावरील निर्माल्य व तलाव परिसरातील कचरा गोळा केला . सकाळी ६ ते १० या वेळात ही मोहीम राबवण्यात आली.
४०० किलो हून अधिक कचरा गोळा करण्यात आले. Rotract Raisoni चे – यश लढ्ढा तसेच जळगांव प्लॉगर्स चे – चेतना जैन (founder) व ओम साहित्य, खुशी सांगोर, रेवती पाटील, कुणाल भंगाळे, हितेश नेरकर, घनश्याम सूर्यवंशी, प्रयाग पाटील, संभव मेहता व आदी उपस्थित होते.