<
जनसंवाद यात्रेच्या समारोपाला 1डिसेंबरला स्वतः येणार-अजितदादा पवार
मुक्ताईनगर – (प्रतिनिधी) – मतदारसंघातील प्रत्येक गावांत वस्त्यांवर पाड्यावर जाऊन तिथल्या नागरिकांशी संवाद साधणे त्यांचे प्रश्न समजून घेणे त्या सोडविण्याचा प्रयत्न करणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवणे यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघात 15 ऑगस्ट पासून राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे दि 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पाश्वभूमीवर निघालेली ही यात्रा भारताच्या संविधान स्विकृत दिनी म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी पुर्ण होईल.
मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात असणाऱ्या 182 गावांमध्ये हि यात्रा जाणार आहे.
दि 14 सप्टेंबर पर्यंत हि यात्रा राऊतझिरा, शेवगा, धोनखेडा, कुऱ्हा हरदो, जुनोने, सोनाटी, आमदगाव, हिंगणे, शिरसाळे, चिचखेडा सिम,कोल्हाडी, नांदगाव,नाडगाव,दादा नगर, प्रतिभानगर,पळासखेड,वरखेड खु, वरखेड बु, राजुर, एनगाव,लोणवाडी, जामठी,येवती, रेवती,चीचखेडा प्रगणे, शेलवड,मुक्तळ,वाकी, बोरगाव, जलचक्र खु, जलचक्र बु, जलचक्र तांडा, वराड बु, वराड खु, साळशिंगी,करंजी, पाचदेवळी,गोळेगाव खु, गोळेगाव बु, भानखेडा,धानोरी, विचवे, धामणगाव तांडा, बोरखेडा नवे, धामणगाव, मोरझिरा, बोरखेडा जुने, बोरखेडा नवे, थेरोळा, कोऱ्हाळा,पिंप्राळा,तालखेडा, चिचखेडा खु,धुळे, पावरी वाडा, भोटे, रिगाव ,सुळे, आदी 57 गावांमध्ये आतापर्यंत पोहचली असून या ठिकाणचा नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे या यात्रेदरम्यान रोहिणी ताई खडसे आणि पक्षाचे पदाधिकारी मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत जात आहेत, नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत छोट्या मोठ्या समस्या तात्काळ तिथल्या तिथे मार्गी लावत आहेत मोठ्या समस्या किंवा सार्वजनिक प्रश्नांबाबत संबंधित कार्यालयाशी, विभागाशी संपर्क साधून एकनाथराव खडसे,रविंद्र भैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. यात्रेदरम्यान युवकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद होण्याचे आवाहन करत आहेत त्याला मोठा प्रतिसाद लाभत असून अनेक युवक, नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत यातून पक्ष संघटन वाढत आहे.
आज दि 15 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह जळगाव येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रोहिणी खडसे यांनी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना जनसंवाद यात्रेच्या आतापर्यंत झालेल्या प्रवासाचा अहवाल सादर केला.
यावेळी अजितदादा पवार यांनी रोहिणी खडसे यांच्याकडून जनसंवाद यात्रेची विस्तृत माहिती जाणून घेतली.
व आपल्या अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करताना ना अजितदादा पवार म्हणाले रोहिणी ताई खडसे यांचा जनसंवाद यात्रेचा उपक्रम कौतुकास्पद आहे
कष्टकरी शेतकरी माय भगिनी आणि युवकांच्या सन्मानासाठी राष्ट्रवादी आपल्या भेटी हे ब्रिदवाक्य घेऊन सुरू केलेली जनसंवाद यात्रा पक्षवाढी साठी आणि जनतेसोबत संपर्क साधण्यासाठी एक संधी आहे.
आता आपण विरोधी पक्षात आहोत
जनतेपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या यात्रेच्या माध्यमातून जाणून घेता येतील त्या सोडविण्याचा प्रयत्न करता येईल रोहिणी ताई खडसे या हे करत आहेत यातून निश्चितच पक्ष घराघरात जाईल इतर नेत्यांनी सुद्धा आपल्या मतदारसंघात जनसंवाद यात्रा सुरू करावी. प्रत्येकाच्या यात्रेच्या समारोपाला मी येईल रोहिणी ताई खडसे यांनी सुरू केलेल्या जनसंवाद यात्रेच्या समारोप समारंभाला 1 डिसेंबर 2022 रोजी मी स्वतः उपस्थित राहील असे अजित दादा पवार यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण भाई गुजराथी,आ अनिलदादा पाटील, माजी मंत्री सतिष अण्णा पाटील, गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, संतोष चौधरी, साहेबराव पाटील,जगदीश वळवी, एजाजभाई मलिक,विलास पाटील, नामदेवराव चौधरी,संदिप पाटील,अशोक लाडवंजारी ,रवींद्र नाना पाटील, वंदना ताई चौधरी,उमेश नेमाडे, अरविंद चितोडीया, सोपान पाटील, मजहर पठाण, मंगला ताई पाटील,तिलोत्तमाताई पाटील, कल्पना ताई पाटील,इंदिरा ताई पाटील, अरविंद मानकरी,ललित बागुल,अभिषेक पाटील, योगेश देसले,रिंकू चौधरी,वाल्मिक पाटील, संजीव पाटील, ईश्वर रहाणे, रमेश नागराज पाटील, राजेश वानखेडे,यु डी पाटील ,आबा पाटील,निवृत्ती पाटील, विशाल महाराज खोले, रामदास पाटील,डॉ बी सी महाजन, दिपक पाटील, प्रदिप साळुंखे,सोपान दुट्टे,रवींद्र दांडगे, रणजित गोयनका,नंदकिशोर हिरोळे, बाळा भाल शंकर,निलेश पाटील, भरत अप्पा पाटील,विनोद कोळी,प्रदिप बडगुजर, विजय चौधरी नईम खान लता सावकारे, माया बारी, श्रीकांत चौधरीआणि जिल्हाभरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.