<
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात “बेरा” श्रवण तपासणीला सुरुवात
जळगाव (प्रतिनिधी) : दिव्यांग प्रमाणपत्र व वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी ऑडिओमेट्री व बेरा या श्रवण तपासणी सुविधा रुग्णालयात सुरु झाल्या आहेत. यामुळे कर्णबधिर दिव्यांगांची होणारी प्रचंड गैरसोय दूर झाली आहे. सकारात्मक मनोबल वाढलेल्या टीमवर्कमुळे प्रशासकीय पातळीवर हे कर्तव्य पूर्ण केल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये कर्णबधिर दिव्यांगांसाठी ‘बेरा’ या श्रवण तपासणी सुविधेची सुरुवात गुरुवार, दि १५ सप्टेंबर रोजी सकाळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते कारण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. मंचावर उपअधिष्ठाता व दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्र प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, विभाग प्रमुख डॉ. अक्षय सरोदे, डॉ. विनोद पवार उपस्थित होते.
कर्णबधिर दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी तसेच विविध शासकीय सुविधेचा लाभ घेण्यासाठी ऑडिओमेट्री व बेरा या श्रवण तपासणी सुविधा आवश्यकता असते. वर्षभरापूर्वी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी ऑडिओमेट्री ही सुविधा योग्य प्रशासकीय पाठपुरावा करून सुरु केली होती. मात्र त्यासह बेरा ही सुविधा देखील आवश्यक होती. यासाठी प्रहार दिव्यांग संघटनेने निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करून बेरा तपासणी सुविधा उपलब्ध केली.
या सुविधेचा प्रारंभ गुरुवारी सकाळी झाला. चाळीसगाव येथील २१ वर्षीय तरुण रोहित पाटील याची बेरा तपासणी करून ही सुविधा सुरु झाली. यानंतर कार्यक्रमात प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, संघर्ष दिव्यांग संघटना, ना. गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यातर्फे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारोती पोटे यांच्यासह कान, नाक व घसा विभागाचे डॉक्टर व सहकाऱ्यांचा हृदय सन्मान करण्यात आला.
प्रस्तावनेत डॉ. अक्षय सरोदे यांनी सुविधेचे माहिती सांगितली. यावेळी वाहन परवाना मिळविण्यासाठी कर्णबधिर दिव्यांगांना लाभणारी वैद्यकीय तपासणी सुविधा सुरु करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी सांगितले की , कर्णबधिर दिव्यांगांची होणारी फरफट थांबविण्यासाठी कान, नाक, घसा विभागामध्ये सुविधा झाल्याने आनंद झाला. दिव्यांगांसाठी लागणारी कार्यवाही करणे हे आमचे प्रशासकीय कर्तव्य आहे. ते पूर्ण झाल्याचे मला समाधान आहे, असेही त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी यांनी तर आभार प्रहार संघटनेचे चाळीसगाव तालुकाध्यक्ष नीलकंठ साबणे यांनी मानले. यावेळी कान नाक घसा विभागाचे ऑडिओलॉजिस्ट मुनज्जा शेख, राजश्री वाघ, डॉ. साहिल, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, मनीषाताई पाटील, जिल्हा सचिव धर्मराज पाटील, पाचोरा तालुकाध्यक्ष महेश गोंड, संघर्ष दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष गणेश पाटील, ना. गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचे समन्वयक शिवाजी पाटील उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी प्रहार संघटनेचे हरीश कुमावत, विश्वास पगारे, सत्यजित पाटील, किशोर पाटील, पंकज पाटील, स्वाती कुमावत यांच्यासह रुग्णालयातील अजय जाधव, प्रकाश पाटील, राकेश सोनार, दिव्यांग मंडळाचे कर्मचारी विशाल दळवी, चेतन निकम, दत्तात्रय पवार, विद्याथी प्रतिनिधी युवराज जाधव यांच्यासह कर्मचारी, विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले.