<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथील केसीई सोसायटी च्या वर्धापन दिनानिमित्त केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय व ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा जिल्हास्तरीय नाट्यछटेचे आयोजन करण्यात आले.
सदर स्पर्धेत विविध शाळांमधील स्पर्धक मोठ्या उत्साहात सहभागी झाले केसीई सोसायटी चे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकार यांच्या हस्ते गणरायाची पूजा करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.मी जिजाऊ बोलतेय , मी भारतमाता बोलतेय , मला मोठं व्हायचंय ,शेतकरी आत्महत्या , झाडांची आत्मकथा , स्वप्नांची परी , बोलकी , बाबा मी बोलतोय , डॉ.आनंदीबाई जोशी , हिरकणी , माझं पाठांतर , सत्यनारायण ,माझी ट्युशन अशा विविध सामाजिक विषयांवर सुंदर अशा नाट्यछटा यावेळी सादर करण्यात आल्या.सदर स्पर्धा ही तीन गटामध्ये घेण्यात आली, त्यात
पहिल्या गटात
१) नाताशा पवार – ( प्रथम )गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालय जळगाव
२) शाश्वत कुलकर्णी – ( द्वितीय ) गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालय जळगाव
३) आर्या वाघ – ( तृतीय ) डॉ.अविनाश आचार्य विद्यालय
४) हंसिका पाटील – ( उत्तेजनार्थ ) उज्ज्वल स्कुल
५) समृद्धी भास्कर ( उत्तेजनार्थ ) बालनिकेतन विद्यामंदिर
गट 2 रा
१) संस्कृती पवनीकर ( प्रथम ) प.न.लुंकड कन्या शाळा
२) केतकी कोरे ( द्वितीय ) प.न.लुंकड कन्या शाळा
३) भूमिका कापडनीस ( तृतीय ) नंदिनीबाई वामराव मुलींचे विद्यालय
४) सिद्धी धांडे ( उत्तेजनार्थ ) ओरिओन सीबीएसई स्कुल
५) शर्वा जोशी ( उत्तेजनार्थ ) प.न.लुंकड कन्या शाळा
गट 3रा
१) कृतिका कोरे ( प्रथम ) प.न.लुंकड कन्या शाळा
२) श्रुती पाटील ( द्वितीय ) नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय
3) उपलक्ष्य पाटील ( तृतीय ) नवीन माध्य.विद्यालय
४) नम्रता पाटील ( उत्तेजनार्थी ) नंदिनीबाई वामनराव विद्यालय
५) आचल रंजितसिंग ( उत्तेजनार्थ ) ओरिओन सीबीएसई स्कुल
वरील सर्व स्पर्धकांना संस्थेचे शैक्षणिक सल्लागार डॉ. योगेश खडके तसेच हास्यजत्रेचे प्रसिद्ध कलाकार हेमंत पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह , प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.डॉ.योगेश खडके यांनी प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धेचे परीक्षण कालादर्श स्मृतिचिन्ह निर्माते सचिन चौघुले तसेच मृदन इंडिया असोसिएशन चे योगेश शुक्ला यांनी केले. प्रसंगी शाळेचे शालेय शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी , मुख्या.प्रणिता झांबरे , मुख्या.रेखा पाटील , आदी उपस्थित होते स्पर्धेचे आयोजन व नियोजन उपशिक्षक योगेश भालेराव तसेच चंद्रकांत कोळी यांनी केले तर सूर्यकांत पाटील , तडवी सर कलाशिक्षक श्री. सतिश भोळे,श्रीमती सुचिता शिरसाठे,श्री. धिरज चौधरी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.