<
जळगाव-(प्रतिनिधी)-धरणगाव येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य टी.एस.बिराजदार कार्यरत आहेत. प्राचार्य महाविद्यालयाचे व शासनाचे नियम ढाब्यावर बसवत आपल्या पदाचा गैरवापर करून महाविद्यालयात भ्रष्टाचार करत आहेत असे तक्रारीत म्हटले आहे. तसेच एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने महाविद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या वेतना बाबत माहिती मागितली असता, त्यांनी ती देखील माहिती अपूर्ण व चुकीची माहिती दिली असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्त्याच म्हणणं आहे. तसेच त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्या मुलाला शासनाच्या नियमाचा भंग करून महाविद्यालयात रुजू करून घेतलेले आहे. तसेच त्यांनी पर्यावरण विषयाचे समन्वयक सी.एस.पाटील यांना मानधन न देता व आर.एम.केंद्रे यांना देखील कमी मानधन देऊन उर्वरित मानधन ची रक्कम त्यांनी स्वतः घेतल्याचं तक्रारदारचे म्हणणे आहे. तसेच त्यांनी पर्यावरण विभागासाठी विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेल्या “फी” चा त्यांनी विद्यापिठाच्या नियमांचा भंग करून त्यांनी वापर केला आहे असे तक्रारीत म्हटले आहे.
याबाबतची तक्रार डॉ.प्रवीण समाधान बोरसे सहा. प्राध्यापक यांनी धरणगाव पोलिसात केली होती, त्यानुसार धरणगाव पोलिसात प्राचार्य टी.एस.बिराजदार यांच्यावर आयपीसी कलम-४१७,४१८,५०४,५०६ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पो.नि.पवन देसले करीत आहेत.