<
मुक्ताईनगर मतदारसंघातील नागरिक सुज्ञ,विकास कामे करतो हे जाणून – रोहिणीताई खडसे
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या सोळाव्या दिवशी रोहिणीताई खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रावेर तालुक्यातील सिंगनुर, दसनुर, आंदलवाडी ,लहान वाघोदा येथे ग्रामस्थां समवेत संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब, अजित दादा यांच्याकडे, “रडत रडत मला राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार जाहीर करा “अशी विनवणी करणाऱ्या आमदार चंद्रकांत पाटील यांना आता राष्ट्रवादीवर बोलण्याचा अधिकार नाही. गेल्या ३० वर्षापासून मुक्ताईनगर मतदारसंघात राष्ट्रवादीला ७० ते ७५ हजार मतदान मिळत आलेले आहे. बोदवड तालुका हा मिनी बारामती म्हणून ओळखला जातो तो सदैव शरद पवार यांच्या पाठीशी उभा आहे. त्यावेळच्या राजकीय परिस्थिती नुसार आ. चंद्रकांत पाटील यांना २०१४ मध्ये राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा दिलेला होता. फक्त तरुण उमेदवार आणि नवीन चेहरा म्हणून त्यांच्या पारड्यात राष्ट्रवादीने मतदान केले होते. ते स्वतः म्हणतात की,फक्त पाच सात -हजार मते राष्ट्रवादीकडे होती,तर पवार साहेब आणि अजित दादा यांच्याकडे ते रडत रडत येऊन पाठिंबा का मागत होते? केवळ पाच -सात हजार मते असताना त्यांना राष्ट्रवादी पुरस्कृत करा ही काकूळतीची विनंती करण्याची गरज काय होती?असा सवाल करून कडवट शिवसैनिक म्हणवणारे आमदार पाटील यांनी यापुढे शिंदे साहेबांशी तरी एकनिष्ठ राहावे असा सल्ला दिला.त्यांच्या निवडणूक प्रचारात आणि रॅलींमध्ये फक्त राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचाच भरणा होता हे त्यांनी त्यावेळचे फोटो आणि व्हिडिओ क्लिप पाहून खात्री करून घ्यावी.जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांनी पक्षादेशानुसार त्यांच्यासाठी उमेदवारी माघारी घेऊन फार मोठा त्याग केला आहे, मात्र या त्यागाची जाणीव त्यांनी ठेवली नाही.अशी घणाघाती टीका युवक राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी केली.
संवाद यात्रेला सर्वच गावातून प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. रोहिणीताई ग्रामस्थ -महिला -युवकांशी संवाद साधून समस्या जाणून घेत आहेत. गेल्या निवडणुकीत पराभव होऊनही जनसेवेची आस असलेल्या रोहिणीताई कार्यकुशल नाथाभाऊंचाच कित्ता गिरवता आहेत असे सांगून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून मा. पवार साहेबांचे ,नाथाभाऊंचे हात मजबूत करावे, असे आवाहन रवींद्र नाना पाटील यांनी केले.
याआधी आंदलवाडी येथे ललित कोळंबे यांनी नाथाभाऊनी गेल्या ३० वर्षात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला. विकासकामांच्या सर्वाधिक कोनशीला असणारा मुक्ताईनगर मतदार संघ राज्यातील एकमेव मतदार संघ असेल असा दावा करून नाथाभाऊनी केलेल्या सभामंडप, बौद्ध विहार, शाळांखोल्या, समजमंदिरे, रस्ते, भव्य पूल, सिंचन योजना, मुक्ताईनगर नामकरण, बोदवड तालुका निर्मिती आदी विविध कामांचा उहापोह श्री कोळंबे यांनी केला.रोहिणीताईचे सक्षम युवा नेतृत्व या मतदार संघाचा भविष्यात कायापालट करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ग्रामस्थांसमवेत संवाद साधताना रोहिणीताई खडसे म्हणाल्या की, गेले तिस वर्ष एकनाथराव खडसे यांनी आपल्या परिसरात भाजप घरोघरी पोहचवली परंतु पक्षातील काही लोकांकडून अशी परिस्थिती निर्माण केली गेली की आम्हाला भाजप सोडावे लागले परंतु शरद पवार साहेबांनी एकनाथराव खडसे साहेबांना विधानपरिषदेत पोहचवून त्यांचा सन्मान केला. एकनाथराव खडसे यांनी या परिसरात अनेक विकास कामे केली गाव अंतर्गत रस्ते व इतर मुलभूत सुविधांसाठी भरगोस निधी उपलब्ध करून दिला जे विकास कामे राहिले असतील ते पण एकनाथराव खडसे यांच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येतील.
त्या पुढे म्हणाल्या की, दसनुर येथील सुकी नदीवरील पुल एकनाथराव खडसे यांनी पाठपुरावा करून मंजुर केला. काही तांत्रिकअडचणी मुळे त्याला उशिरा निधी प्राप्त झाला. त्याचे श्रेय दुसरेच घेत आहेत परंतु आपण सुज्ञ आहात आपण विकास कामे करण्यासाठी कोण सक्षम आहे हे आपण जाणतात. तुम्ही सर्व आतापर्यंत एकनाथराव खडसे साहेबांच्या पाठीमागे उभे राहिले तसेच भविष्यकाळात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत राहण्याचे रोहिणी खडसे यांनी उपस्थितांना आवाहन केले
जनसंवाद यात्रेत यात्रा प्रमुख निवृत्तीभाऊ पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जि प सदस्य कैलासभाऊ सरोदे, प स सदस्य दिपकभाऊ पाटील,किशोर गायकवाड ,योगिता ताई वानखेडे,सुनिलभाऊ कोंडे,युवक अध्यक्ष सचिन पाटील,मेहमूद शेख,वाय डी पाटील,कुणाल महाले,गौरव वानखेडे,अमोल महाजन,सचिन महाले,शशांक पाटील,श्रीकांत चौधरी,योगेश्वर कोळी,सिद्धार्थ तायडे,किशोर पाटील,रुपेश पाटील, कमलाकर पाटील,रवींद्र पाटील, नितीन पाटील,पवन चौधरी,राजेश पाटील,शुभम मुर्हेकर,जिवन बोरनारे,नितीन पाटील,केतन पाटील,वासुदेव चौधरी,सुशिल तायडे,ललित कोळंबे, चंद्रकांत पाटील, सतिष पाटील,प्रदिप साळुंखे, नंदकिशोर हिरोळे,बाळाभाऊ भालशंकर,चेतन राजपुत,वसंता पाटील,विशाल रोठे,भुषण धनगर,रोहन च-हाटे,नवाज पिंजारी,भूषण कोळी,रवी खेवलकर,नईम खान, डॉ पठाण या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होते.
सिंगनुर येथे श्रीराम कोळी, शांताराम कोळी,उपसरपंच कुंदन कोळी,अनिल तायडे,विनोद तायडे, प्रविण मोरे, देवानंद मोरे, सुरेश तायडे, महेंद्र महाजन, संतोष कोळी,अरमान शाह, अनिल तायडे, निवृत्ती महाजन, प्रल्हाद सोनार, तुषार कोळी, दिलीप कोळी, नारायण कोळी, संतोष कोळी, युवराज सोनार, रईस भाई,अरुणा ताई तायडे, अनिल तायडे, प्रविण तायडे, दसनुर येथील सरपंच भारती ताई महाजन, बिपिन चौधरी, सरजु पाटील, स्वप्निल चौधरी, जितेंद्र चौधरी, योगेश चौधरी, अनिल चौधरी, बाळूभाऊ तायडे, कैलास भालेराव , सुवर्णा ताई चौधरी, महेश चौधरी, चंद्रहास चौधरी, विक्रम चौधरी, दत्तात्रय चौधरी, प्रकाश महाजन, अशोक पाटील, पुरुषोत्तम कोळी, नागो तायडे
आंदलवाडी येथील सरपंच दिपाली ताई कोळी, उपसरपंच सुपडू भाट, संजय कोळी, विनायक कोळी, दिपक कोळी, विशाल कोळी, आनंदा कोळी, रोशन भाट, अतुल कोळी, चेतन कोळी, आकाश कोळी, साहेबराव कोळी, पिरण भाट, चंद्राबाई कोळी, विजयाताई कोळी, शोभाताई कोळी, नलिनी ताई कोळी, संजय तायडे, बंटी कोळी, कैलास कोळी, युवराज कोळी, ललित कोळी, वाघोदा खुर्द येथील सरपंच रविंद्र कोलते, जितेंद्र चौधरी सर, वसंतराव शिंदे,उपसरपंच अकिल शहा,उषाबाई शिंदे,कविता ताई तेली, डिगंबर कोलते,राजु भाऊ कोळी, धोंडू भाऊ कोळी, सुरेश शिंदे, मयुर चौधरी, अब्दुल शहा, रिजवान शहा, अशोक कोळी, वसंत भास्कर शिंदे, सुभाष पाटील मुसा भाई पटेल, अशोक कोळी, महेंद्र चौधरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.