<
जळगाव – विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड प्रश्न असतात आणि या सर्व प्रश्नांना इच्छा, वेळ आणि आवड यांची जोड दिली तर तुम्ही चांगले संशोधक बनू शकता असं मत वैज्ञानिक जयंत नारळीकर यांनी अनुभूती निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांची संवाद साधतांना व्यक्त केले. याप्रसंगी त्यांनी व गणितज्ञ डॉ मंगला नारळीकर यांनीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. खगोलशास्त्र व भौतिक शास्त्र याविषयावर बोलतांना गणितातील कोडी, पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती याविषयी महत्वपूर्ण माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. बींग बॅंग थेअरी विषयीही त्यांनी आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांमधे खगोलशास्त्राची आवड निर्माण होण्यासाठी मार्गदर्शन केले.