<
जळगाव – (प्रतिनिधी) – तालुक्यातील जळके येथील रमेश आप्पा मित्र परिवारातर्फे जळगाव तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रमेश (आप्पा) जगन्नाथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अंध अपंग मुकबधीर अशा व्यक्तींसाठी प्रमाणपत्र मिळणेसाठी शिबाराचे आयोजन तसेच कामधेनू गोशाळेवर लंम्पी आजारांवरील लसीचे लसीकरण करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य पवन भाऊ सोनवणे तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रताप भाऊ पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी आलेल्या मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर जि.प.सदस्य प्रताप भाऊ पाटील यांच्या हस्ते अपंग लाभार्थ्यांची नोंदणी करुन सुरुवात करण्यात आली.
यावेळी जळगाव तालुका आत्मा समिती अध्यक्ष पि .के. पाटील, जळगाव दक्षता समिती सदस्य अर्जुन पाटील, हरिभक्त परायण रामचंद्र महाराज, नाना पाटील, जळके वि.का.सोसायटी माजी चेअरमन धनराज पाटील, माजी चेअरमन कविश्वर पाटील,माजी चेअरमन प्रविण पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष वसंतवाडी ज्ञानेश्वर चव्हाण,समाज भुषण गौरी ग्रुपचे अध्यक्ष सुमीत पाटील तसेच गावातील व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरात एकुण ७६अपंग लाभार्थ्यांची नोंदणी झाली तसेच वसंतवाडी येथील कामधेनू गोशाळा येथे रमेश आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जळके पशुवैद्यकीय उपकेंद्र यांच्या सौजन्याने लंम्पी आजारांवरील लसीचे लसीकरण जि.प.सदस्य, पवनभाऊ सोनवणे,जि.प.सदस्य प्रताप भाऊ पाटील यांच्या उपस्थितीत जळगाव तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ.सलीम तडवी, जळके पशुवैद्यकीय उपकेंद्र येथील डॉ.आर.एल.डांबरे यांनी या गोशाळेतील गिर जातीच्या साधारण ८००जनावरांचे लंम्पी आजारांवरील लसीचे लसीकरण शिरसोली पशुवैद्यकीय उपकेंद्र येथील डॉ.किशोर पाटील तसेच कंडारी पशुवैद्यकीय उपकेंद्र येथील डॉ.हेमंत कुमावत यांच्या सहयोगाने पुर्ण केले
अशा प्रकारे रमेश आप्पा मित्र परिवारातर्फे रमेश आप्पा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनोखा समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात आला यावेळी गोशाळेचे संचालक रघु भाऊ भरवाड (काठेवाडी),मघाभाई, दिनेश पाटील व गोशाळेवरील सर्व गोसेवक उपस्थित होते.