<
भडगाव – (प्रतिनिधी) – येथील सौ सु . गि .पाटील माध्यमिक विदयालयात व सौ.ज .ग . पूर्णपात्री ज्यु कॉलेज , किमान कौशल्य विभागात सत्यशोधक समाज स्थापना दिवस”. उत्साहात साजरा करण्यात आला.
दि २४ शनिवार रोजी सकाळी शाळेच्या प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंचावर सर्वप्रथम भारताचे शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य व्ही. एस. साळुंखे व उपप्राचार्य एस. एम. सोनवणे तसेच प्र. पर्यवेक्षक शरद महाजन उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य एस.एम. सोनवणे होते. मा . ज्योतिराव फुले सत्यशोधक समाज या विषयांवर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. त्यात कु. साक्षी अनिल महाजन, कु . खुशी संजय नरवाडे, कु. उर्वशी प्रशांत मराठे , कु. प्राची दिलीप वजीरे, कु. दिव्या कैलास गायकवाड, कु. जागृती ईश्वर राजपूत, कु. गायत्री जितेंद्र बोरसे, तसेच महेश राकेश पाटील, ओम प्रवीण राजपूत, मुकेश ओमकांत देसले, श्लोक धम्मपाल सुरवाडे, निशांत किशोर पुजारी, या मुला- मुलींनी सत्यशोधक समाजाचे विचार मांडले, या दिवशी निबंध स्पर्धा ही घेण्यात आली त्यात गौरव ईश्वर माळी, कृष्णा मधुकर पाटील, अक्षय प्रवीण पाटील. या मुलांचे क्रमशः नंबर आले.
शिक्षकांमधून सत्यशोधक समाजाचे विचार शरद महाजन, पी. जे. विसपुते , डॉ, सचिन भोसले , बाळासाहेब जडे यांनी मांडले. उत्कृष्ट फलक लेखन आर. सी. ठाकूर यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र. पर्यवेक्षक शरद महाजन यांनी केले. तर सूत्रसंचालन एस. पी. सोनवणे यांनी केले. आभार एन. व्ही. जकातदार यांनी मानले. यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू – भगिनी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.