<
भडगाव-(प्रतिनिधी) – महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्नित नवलभाऊ कृषि महाविद्यालय अमळनेर येथील अंतीम वर्षांतील विदयार्थीनी कृषिकन्या साक्षी नरसिंग तोंडारे , अश्विनी रमेश कुवर , आकांक्षा जितेंद्र मोरे , सायली देविदास हिरे, कामिनी काटे ,यांनी ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत बांबरूड बु।। ता भडगाव येथे गावसर्वेक्षण केले. सरपंच शितल महाजन व प्रगतशील शेतकरी मंगेश रतन पाटील, संजय दिनकर पाटील, बालकृष्ण काशिनाथ पिंगळे, गोवर्धन चिंतामण महाजन, राजेंद्र सुखदेव पाटील व ग्रामपंचायत सदस्य यांनी कृषीकन्यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमात कृषिमहाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. शुभांगी चव्हाण, प्रा. गिरिष पाटील, प्रा. संदिप सांळुंखे, प्रा. सुदिप पाटील, प्रा. नरेंद्र बोरसे, प्रा. तुषार देसले, प्रा. लक्ष्मण बोंद्रे, प्रा. महेश चव्हाण, प्रा. अमोल घाडगे, प्रा. घनश्याम पवार, प्रा. विशाल भाकडे, प्रा. शिवाजी गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या हे गावातील पिक लागवड पद्धती, आधुनीक शेतीची माहिती, माती व पाणी परिक्षण, ई-पीक पाहणी अँप बद्दल माहिती दिली. त्यात मागील वर्षभराच्या अनुभवावरून व स्थानिक पातळीवरून आलेल्या सुचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल ॲप मध्ये काही बदल करून शेतकयांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुलभ मोबाईल ॲप व्हर्जन- २ विकसीत करण्यात आलेले आहे. या बद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली. तसेच इतर शेतीसंबंधी माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.