Wednesday, March 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोऱ्यात आंबेडकरी जनतेचे तीव्र आंदोलन;निपाणे घटनेतील आरोपींच्या अटकेची मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/09/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

पाचोरा-(वार्ताहर)-तालुक्यातील निपाणे येथे एका दलित समाजाच्या वृद्ध महिलेचा अंत्यसंस्कार गावातील सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये करण्यास जातीयवादी मानसीकतेतून मज्जाव केल्याची घटना दि. १२ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. ही घटना अतिशय निंदनीय असुन या प्रकरणात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मनोहर (रावसाहेब)गिरधर पाटील यांचे सह ११ संशयितांच्या विरोधात पाचोरा पोलिसात अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल होऊन देखील अद्याप पोलिसांनी आरोपींना अटक न केल्याच्या निषेधार्थ पाचोरा तालुक्यातील सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.तसेच आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास शनिवारी यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.आंदोलनात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.


सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले. यावेळी आरोपीला तात्काळ अटक झालीच पाहिजे,जातीयवादी मनोवृत्तीचा निषेध असो यासह महापुरुषांच्या जयजयकाराच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.यावेळी बोलतांना ऍड रोहित ब्राह्मणे यांनी घटनेची कायदेशीर बाजू उपास्थितांना समजावून सांगत गरज पडल्यास सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढली जाईल असा विश्वास उपस्थितांना दिला. प्रस्थापित राजकीय पक्षांनी आंबेडकरी जनतेला गृहीत धरू नये असे सांगत घटनेचे तपास अधिकारी तथा पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे यांनी आंदोलनकर्त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न देखील करू नये असे त्यांनी बजावले.
यावेळी आकाश नन्नवरे, किशोर डोंगरे यांनी मनोगत व्यक्त करत आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा पोलिसांना इशारा दिला.आंदोलनकर्त्यांनी पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना निवेदन दिले.त्यांनी आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचवण्याचे उपस्थितांना आश्वासन दिले.यावेळी पाचोरा शहरातील नागसेन नगर ,जनता वसाहत, मिलिंद नगर, आंबेडकर नगर गाडगेबाबा नगर, भिम नगर यासह आदी भागातील तरुणांसह विविध आंबेडकरी समाज संघटनांचे पदाधिकारी व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

देशमुख महाविद्यालयात रासेयो स्थापना दिनानिमित्त श्रमसंस्कार शिबीर

Next Post

भाजपा तर्फे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अंतर्गत भव्य नेत्र तपासणी शिबिर

Next Post

भाजपा तर्फे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अंतर्गत भव्य नेत्र तपासणी शिबिर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d