<
भडगाव- “हिंदी साहित्यामधे संत,कवि, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते यांचे महत्त्वाचे योगदान आहे.हिंदी साहित्यामध्ये संत कबीर, तुलसीदास,मुंशीप्रेमचंद, हरीवंशराय बच्चन , अटलबिहारी वाजपेयी, मौखिक गीत, आदिवासी साहित्य यांचे विपुल लेखन आहे.
या साहित्याचा वापर विद्यार्थ्यांनी रोजगार मिळवण्यासाठी करावा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा मध्ये सहभागी होवून स्वताचा व्यक्तीमत्वविकास करावा,संत साहित्यातून हिंदी भाषेची महती मिळते” असे विचार प्रा.अंकुश खोब्रागडे, भुगोल विभाग प्रमुख आर.एफ.एन.एस.वरीष्ठ विज्ञान महाविद्यालय, अक्कलकुवा जि.नंदुरबार यांनी मांडले,ते चित्र प्रदर्शन चे उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी व परीक्षक होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालया चे कला व वाणिज्य विभागाचे समन्वयक व भुगोल विभाग प्रमुख प्रा डॉ संजय भैसे होते.प्रमुख पाहुणे म्हणून भडगाव महाविद्या लयाचे प्राचार्य डॉ एन एन गायकवाड होते यावेळी ईतीहास विभाग प्रमुख डॉ सी.एस.पाटील, वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ एस.एन. हडोळतीकर, अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ.बि.एस भालेराव, प्रा.जनार्दन देवरे, इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा एस.सी.पाटील, मराठी विभाग प्रमुख डॉ.ए.एम देशमुख,प्रा.सुरेश कोळी होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालय प्रमुख प्रा.रचना गजभिये यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा देवेंद्र मस्की यांनी मानले या कार्यक्रमाच्या वेळी शिक्षकेतर कर्मचारी, सहभागी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.