<
भडगांव प्रतिनिधी:- तालुक्यातील बाबंरुड प्र.ब शिवारातील विजयसिंग लालचंद परदेशी रा. बाबरुड प्र.ब यांच्या शेतातुन पहाटे ३ वाजेच्या सुमारास शेतातुन मोसंबी तोडुन गोण्यात भरून गाडी क्र.एम.एच-१९- एस-९५८६ टाटा एस गाड़ी मध्ये भरीत असल्याचे आढळल्याने सहा आरोपीना आज भडगांव पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली
याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील बाबरुंड प्र.ब शिवारातील गट नं २२० मधील शेतात विजयसिंग लालचंद परदेशी यांनी १ हेक्टर ४० आर मध्ये मोसंबी फळबाग लावलेली आहे मोंसबी परिपक्व झाले असुन ते तोडणीस आलेले आहे. असे असतांना दि.२७/ ९/ २०२२ रोजीच्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास शेजारील शेत असणारे बाबुसिंग परदेशी हे त्यांच्या शेतातील गुरांचे गोट्यात असतांना त्यांना कोणी तरी बाजुच्या शेतातील मोसंबी तोडत असल्याचे चाहुल लागल्याने त्यांनी शेतात येवुन बघितले असता ५ ते ६ जण शेतातुन मोसंबी तोडून गोण्या मध्ये भरून टाटा एस वाहनात भरीत होते त्यांनी शेतमालक विजयसिंग लालचंद परदेशी यांना बोलावुन तीन ते चार जण जमा झाल्याने वाहन चालका सह पाच ते सहा जणांनी तेथुन पळ काढला व त्याचा पाठलाग करून त्याना पकडुन पोलिसांच्या स्वाधिन केले याबाबत ५० हजार रुपये किमंती ची २ टन मोसंबी शेत मालकांची संमती नसतांना शेतात प्रवेश करून ५० हजार रुपये किमंतीची मोसंबी चोरी केली म्हणुन भडगांव पोलिस स्टेशनला फिर्यादी विजयसिंग लालचंद परदेशी यांच्या फिर्यादी वरून आरोपी १) भावेश विजय महाजन रा. भागवत कॉलणी भडगांव २) तुषार मदनसिंग परदेशी रा.वाडे ता.भडगांव ३) भुषण गोविंद परदेशी रा. बाबंरुड प्र.भ ता.भडगांव ४) युवराज उर्फ भैय्या भिमसिंग परदेशी रा.लोहटार ता. पाचोरा ५) कल्पेश सुरेश वाघ रा. लोहटार ता. पाचोरा ६) हरिष चतरसिंग परदेशी रा.लोहटार ता.पाचोरा असे सहा जणा विरुद्ध भडगांव पोलिस स्टेशनला भांदवी ३७९ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शना खाली ए.एस.आय छबुलाल नांगरे हे करीत आहे.