<
सेवा,स्नेह व समर्पण या भूमिकेतून कार्य करणे हेच रेडक्रॉसचे धेय्य आणि हे कार्य निरंतर सुरु राहील अशा शब्दांत जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष श्री. अभिजीत राऊत यांचे मनोगत
जळगाव- (प्रतिनिधी) – मानवतेच्या भूमिकेतून कार्य करणे रेडक्रॉसचे धेय्य असून आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सेवाकार्य सुरु आहे आणि हे कार्य निरंतर सुरु राहील अशा आश्वासक शब्दांत जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष श्री.अभिजीत राऊत यांनी रेडक्रॉसच्या वार्षिक सर्व साधारण सभेत मनोगत व्यक्त केले.
इंडियन रेडक्रॉस सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हाधिकारी श्री. अभिजीत राउत यांचे अध्यक्षतेखाली रेडक्रॉस भवन जळगाव येथे उत्साहात संपन्न झाली. रेडक्रॉसचे संस्थापक सर हेनरी ड्युनंट यांच्या प्रतिमेस माल्यार्पण आणि दिप प्रज्वलन करून रेडक्रॉस गीत सादर करण्यात आले. कार्यकारिणी सदस्य सौ. पुष्पाताई भंडारी यांच्या शब्दांत दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली. रेडक्रॉसचे चेयरमन विनोद बियाणी यांनी मागील वर्षाचे इतिवृत सभेसमोर सादर केले. त्यास सभेने एकमताने मंजुरी दिली. चेअरमन रक्तकेंद्र डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी ब्लड बँकेचा वार्षिक कामकाजाचा कार्य अहवाल सादर केला. रेडक्रॉसचे चेयरमन विनोद बियाणी यांनी रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व त्या माध्यमातून रेडक्रॉस करीत असलेले कार्य प्रगतीचा आढावा सादर करत भविष्यातील उपक्रमांबाबत माहिती दिली.
रेडक्रॉसच्या ज्युनियर व युथ रेडक्रॉस समितीच्या चेयरमन डॉ. अपर्णा मकासरे यांनी शालेय व महाविद्यालयीन स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या ज्युनियर व युथ रेडक्रॉस शाखांबद्दल माहिती देऊन युवकांना प्रोत्साहित करण्याच्या विविध प्रकल्पांबाबत सभेला माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन चेअरमन श्री. सुभाष सांखला यांनी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत वर्षभरातील उपक्रमांची माहिती दिली. एक लाख कोविड लसीकरण करणारे रेडक्रॉस लसीकरण केंद्र असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले.
उपाध्यक्ष गनी मेमन यांनी संपूर्ण वर्षभरातील सर्व सामाजिक उपक्रमाची विस्तृत माहिती दिली. यात प्रामुख्याने या अहवाल वर्षात सुरु करण्यात आलेल्या रेडक्रॉस भवन येथील रेडक्रॉस दवाखाना, पिंप्राळा येथील रेडक्रॉस दवाखाना व या दवाखान्यातील सर्व सुविधा यांची माहिती देत जास्तीत जास्त नागरिकांनी याचा फायदा घेण्याबाबत आवाहन केले. आर्थिक वर्ष २०२० – २०२१ चे अंकेक्षित नफा तोटा पत्रके व ताळेबंद, पुढील वर्षाचे उत्पन्न खर्चाचे अंदाज पत्रक तसेच ऑडिटरची नेमणूक करून त्यांचा मेहनताना ठरविणे हे सर्व विषय श्री. शेखर सोनाळकर यांनी सादर केले.
कार्यकारिणी सदस्य श्री. धनंजय जकातदार यांनी रेडक्रॉसच्या सेवाकार्यात ज्यांन योगदान देणाऱ्या सर्वांची आठवण देत सर्वांचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले. जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा यांनी सूत्रसंचलन केले. उपस्थित सर्व सभासदांनी रेडक्रॉसच्या सर्व सामाजिक कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. वार्षिक सभा यशस्वितेसाठी प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी, लेखापाल महेश सोनगिरे, संजय साळुंखे, सहाय्यक मनोज वाणी, योगेश सपकाळे, राहुल पाटील, समाधन वाघ, शीतल शिंपी यांनी परिश्रम घेतले.