<
जळगांव(प्रतिनीधी)- कृषिउत्पन्न बाजार समितीच्या हमाल मापाडी संघटनेचे कामगार नेते मा.धूडकुभाऊ सपकाळे यांच्यावर हमालांच्या लायसेन्स संदर्भात वादा मुळे घातक हल्ला झालेला होता. या गुन्ह्यात संशयित मुख्य सूत्रधार व आरोपी असलेले काॅमेश सपकाळे यांचा जामीन अर्ज दि.२१रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. हमाल कामगारांचे लायसेन्स संदर्भात आणि माणसे पुरविण्याच्या वादावरून धुडकु सपकाळे व गजानन देशमुख यांच्यावर शहरातील राका चौक येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला होता . त्यातील एक आरोपी कॉमेश सपकाळे यांच्या कडून जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात आला होता.फिर्यादी पक्षा तर्फे जिल्हा सरकारी वकील अँड केतन ढाके व अँड वसंत भोलंकर यांनी काम पाहिले तर आरोपी पक्षातर्फे अँड सागर चित्रे यांच्या युक्तीवादा नंतर जिल्हा सत्र न्यायालयात जळगाव प्रमुख न्यायाधिश गोविंद सानप यांनी आरोपी कॉमेश सपकाळे याचा जामीन फेटाळला. असे धुडकूभाऊ सपकाळे समर्थक भागवत सपकाळे यांनी सत्यमेव जयतेच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.