<
पुसद-(प्रतिनिधी) – गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय पुसद यांच्या वतीने समाजकार्य स्नातक भाग-2 यांच्या शैक्षणिक सत्रातील क्षेत्रकार्य म्हणून व्हिलेज प्लेसमेंट म्हणून एक पाच दिवसाचा घटक असतो त्यामध्ये गावामध्ये जाऊन गावातील वेगवेगळ्या समस्या शोधून त्या संदर्भात वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. दिनांक 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2019 या पाच दिवसात माणिकडोह गावाची निवड करून गावचे सरपंच सौ.दुर्गाबाई तुकाराम राठोड यांच्या कडून परवानगी घेऊन गावात वेगवेगळे त्यामध्ये वृक्षारोपण, स्वच्छता रॅली, बचत गट मार्गदर्शन शिबीर, वृद्धांच्या समस्यांवर कार्यक्रम, विधवा महिला समस्येवर कार्यक्रम, कृषि विषयक समस्यांवर कार्यक्रम, शालेय क्रीडा स्पर्धा, युवकासोबत चर्चा, मतदान जनजागृती कार्यक्रम, शेतीशी जोडव्यावसाय शेळीपालन कुक्कुटपालन या संदर्भात मार्गदर्शन शिबीर, सामाजिक समस्यांवर पथनाट्य, रोजगार हमी योजना संदर्भात मार्गदर्शन शिबीर,दारिद्र्य रेषेखालील लोकांसोबत चर्चा इ.कार्यक्रम राबविण्यात आले त्यामध्ये गावातील ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्त समिती अशा सेविका जि प. शाळा मुख्यध्यापक तसेच गावातील लोकांनी चांगल्या प्रकारे दिला व सक्रिय सहभाग नोंदविला.. या कार्यक्रमासाठी समाजकार्य भाग 2 चे विध्यार्थी गोपाल राठोड,प्रशांत गुव्हाडे, ऋषिकेश राठोड,राजपाल राठोड,वैष्णवी कसंबे, वैष्णवी कदम,सुश्मिता पाईकराव विद्यार्थी सहभागी होते व मार्गदर्शक प्रा.मारोती खिल्लारे सर यांनी कार्यक्रमासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले. दिनांक 20 सप्टेंबर 2019 रोजी समारोपीय कार्यक्रम घेऊन ज्या शालेय स्पर्धा घेतल्या होत्या त्या स्पर्धेतील विजयी विध्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून गावकरी आणि ग्रामपंचायत चे आभार मानून निरोप घेण्यात आला.