<
यावल-(प्रतिनिधी) – 02/10/2022 रोजी यावल न्यायालयात न्यायदंडाधिकारी श्री.मनोज बनचरे आणि श्री.विनोद डामरे तसेच यावल वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.विक्रम पदमोर ,यावल तालुका विधी सेवा समिती चे पदाधिकारी ॲडव्होकेट श्री. मोरे,श्री.सुराळकर,श्री.कुलकर्णी आणि न्यायालयीन कर्मचारी यांचे उपस्थितीत 2 ऑक्टोबर निमित्त महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्री यांचे फोटो पुजन करून न्यायालयाचे परिसर साफसफाई करीत स्वच्छता अभियान कार्यक्रम करण्यात आला. तसेच त्यानंतर मौजे- डोंगरदे ता. यावल जि. जळगाव या आदिवासी पाड्यात दिनांक 1ऑक्टोंबर ते 7 ऑक्टोंबर या कालावधीत वन्यजीव सप्ताह निमित्त यावल वनविभाग आणि यावल तालुका विधी सेवा समिती यांचे संयुक्तरीत्या कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमात वन्यजीव संरक्षण, मानव व वन्यजीव संघर्ष, कौटुंबिक कायदे, न्यायालयीन कामकाज, दैनंदिन जीवनातील नियम, कायदेविषयक मार्गदर्शन डोंगरदे ग्रामस्थांना यावल कोर्टाचे न्यायधीश श्री.बनचरे आणि श्री.डामरे,यावल वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.पदमोर आणि ॲडव्होकेटश्री.मोरे,श्री.सुराळकर, श्री.कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात आभार प्रदर्शन डोंगरदे येथील श्री. जिरबान पावरा यांनी केले. कार्यक्रमात उपस्थिती वनपाल श्री. रवि तायडे , वन संरक्षण समिती अध्यक्ष श्री.गंगाधर तायडे , वनरक्षक कॄष्णा शेळके, गोवर्धन डोंगरे, निंबा पाटील, प्रकाश बारेला, तुकाराम लवटे,जिवन नागरगोजे,गणेश चौधरी,नंदलाल वंजारी, सचिन चव्हाण,पुंडलिक पाटील, युवराज पावरा, बागुल, घारु,अमिरा पावरा, जेलु पावरा, कुरबान पावरा ,संतोष भिलाला उपस्थितीत होते.