<
भडगाव-( प्रमोद सोनवणे) – नुकत्याच अतिवृष्टीच्या झालेल्या पाऊसामुळे गिरणा जामदा उजवा कालव्याला बोरखेडे पिराचे ता. चाळीसगाव भागात , बांबरुड प्र ब भागात, वाडे शिवारात भागात अशा ३ गावांच्या भागातील कालव्याचा भाग तुटुन मोठे भगदाड पडलेले आहेत. या तिन्ही ठिकाणच्या कालव्याच्या फुटलेल्या भागात माती व दगड टाकुन दुरुस्तीचे काम तात्काळ करण्यात यावे. रब्बी हंगामाच्या पिक पेरण्यांपुर्वी कालव्याच्या भगदाड पडलेल्या भागांची दुरुस्ती करण्याची अपेक्षा शेतकर्यांना आहे. याबाबत भडगाव गिरणा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता पी टी पाटील यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले कि, याबाबत जळगाव गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पञान्वये कळविलेले आहे. कार्यकारी अभियंता यांनी या संबधीत ठिकाणची परीस्थिती पाहुन निर्णय घेण्यात येईल.
अशी माहिती बोलतांना दिली.माञ उजवा कालव्याचे अतिवृष्टीच्या पाऊसाच्या पाण्यामुळे बोरखेडे पिराचे ता. चाळीसगाव, वाडे ता. भडगाव,बांबरुड प्र ब ता. भडगाव या तिन्ही ठिकाणचे कालव्याला भगदाड पडुनही गिरणा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी वर्गातुन संतापाची लाट उसळलेली आहे. जळगाव गिरणा पाटबंधारे विभाग सुस्त बनलेले आहे. आता रब्बी हंगाम पिक पेरणी हंगाम येणार आहे. गिरणा धरणात यंदा शंभर टक्के पाणीसाठा आहे. तरी पाटबंधारे विभागाने तात्काळ या कालव्याच्या बोरखेडे पिराचे, वाडे,बांबरुड प्र ब या तिन्ही ठिकाणचे पडलेले भगदाड दगड, मातीने वा सिंमेट क्रांक्रीट कामाने दुरुस्त करण्यात यावेत. तसेच कालवा दुतर्फा काटेरी झाडे झुडपे तोडुन स्वच्छता व कालव्याला ठिकठिकाणी माती,मुरुम टाकुन भक्कम काम करण्यात यावे. रब्बी हंगामासाठी पुर्वीच कालव्याचे दुरुस्ती व स्वच्छतेचे काम करण्यात यावे. अशी मागणी बोरखेडे पिराचे,टेकवाडे बुद्रुक, टेकवाडे खुर्द, वाडे, बांबरुड प्र ब, गोंडगाव, लोण पिराचे, कनाशी, देव्हारी, बोदर्डे, निंभोरा, कोठली यासह इतर गावातील शेतकरी वर्गातुन करण्यात येत आहे.
याबाबत माहिती अशी कि, भडगाव तालुक्यात नुकताच अतिवृष्टीचा जोरदार पाऊस बरसुन सर्वञ नुकसानीचा ठरला आहे. कालव्यात अतिवृष्टीचा धो धो पाऊस दुथडी वाहील्याने बोरखेडे पिराचे ता. चाळीसगाव शिवारात , तसेच बांबरुड प्र ब गावाजवळील भागात तसेच वाडे शिवारात नाल्याजवळील भागात अशा ३ ठिकाणी या कालव्याला मोठे भगदाड पडुन नुकसान झालेले आहे. माञ यामुळे शेती पिकांचे नुकसान झालेले नाही. याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. यावर्षी गिरणा धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे.आज जर या तिन्ही भागात कालव्याचे दुरुस्तीचे काम झाले नाही तर रब्बी हंगामासाठी कालव्याला पाण्याचे आवर्तनासाठी मोठया अडचणीचे ठरु शकते. तरी पाटबंधारे विभागाच्या प्रशासनाने याकडे लक्ष दयावे.तात्काळ बोरखेडे, बांबरुड प्र ब, वाडे या तिन्ही भागात कालव्याचे पडलेल्या भागात माती, दगड, मुरुम टाकुन तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे. वा सिमेंट काॅक्रीट काम करण्याची मागणी शेतकरी वर्गातुन केली जात आहे.
उजवा कालवा स्वच्छता करण्याचीही मागणी – उजवा कालव्याचे अतिवृष्टीच्या पाऊसाच्या पाण्यामुळे दयनिय अवस्था झालेली आहे. या कालव्याचे फुटलेल्या भागात दगड, माती, मुरुम टाकुन दुरुस्त करुन दुतर्फा मुरुम, माती टाकुन कालव्याची भक्कम स्थिती करण्यात यावी. तसेच कालव्यालगत वाढलेली अस्वच्छता, काटेरी झाडे, झुडपे तोडुन स्वच्छता मोहिम राबविण्यात यावी. म्हणजेच रब्बी हंगाम पिक पेरणीच्या वेळी पाण्याचे आवर्तनाचे पाणी सोडण्यास ञासाचे ठरणार नाही. पाटबंधारे विभागाने तात्काळ दखल घेण्याची शेतकर्यांना अपेक्षा आहे. याकडे चाळीसगाव आमदार मंगेश चव्हाण, भडगाव पाचोरा आमदार किशोर पाटील यांनीही लक्ष देण्याची मागणी चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यातील शेतकरी वर्गातुन तसेच ग्रामपंचायत पदाधिकार्यां कडुन होतांना दिसत आहे.
प्रतिक्रीया —अतिवृष्टीच्या पाऊसाच्या पाण्यामुळे गिरणा जामदा उजवा कालव्याच्या बोरखेडे पिराचे, वाडे,बांबरुड प्र ब येथील भागात कालवा फुटुन नुकसान झाले आहे. याबाबत जळगाव गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना कळविलेले आहे. त्यांनी याठिकाणची पाहणी केल्यानंतर याबाबतचा कालवा दुरुस्तीचा निर्णय घेतला जाईल.
पी. टी. पाटील उपअभियंता गिरणा पाटबंधारे विभाग भडगाव.
प्रतिक्रीया — जामदा उजवा कालवा वाडे, बांबरुड प्र ब, बोरखेडे पिराचे या तीन ठिकाणी पाऊसाच्या पाण्यामुळे कालव्याचा भाग फुटुन नुकसान झालेले आहे.तरी या कालव्याचे भागाचे दुरुस्तीचे काम करण्यात यावे तसेच कालव्यालगत झाडे झुडपे तोडुन स्वच्छता करण्यात यावी अशी शेतकर्यां मार्फत मागणी करण्यात येत आहे.