<
जळगाव(धर्मेश पालवे):- शहरातील रामानंद नगर येथील चर्च जवळील भगीरथी प्राथमिक व माध्यमिक शाळेत आज दि २२ रोजी प्रख्यात लेखक, साहित्यिक व कवी असलेले प्राध्यापक प्रकाश महाजन यांचे सालाबाद प्रमाणे १८व्या काव्य संग्राहानंतर १९व्या “त्रिवेणी संगम” या काव्य संग्राहाचे प्रकाशन करण्यात आले. या “त्रिवेणी संगम” काव्य संग्रहात मराठी ३९, हिंदी ३३ व इंग्रजी ३७ एकूण १०९ काव्य या तिन्ही भाषेत एकत्रित काव्य लिहिले असून कवी प्रकाश महाजन यांनी प्रेम, धर्म, राष्ट्र, व भाषा यावर काव्यरूपात लिखाण केले आहे. सदर कार्यक्रमात प्रकाशनाचे अध्यक्ष स्थान प्रा. डॉ. पी एस चौधरी यांनी भूषवले ,तर या काव्य संग्रहाचे प्रकाशन प्रा. आर.डी.कोळी यांनी केले.त्याच बरोबर सूत्र संचालन प्रा. अशोक पारधे यांनी केले.आणि या सोहळ्यास जेष्ठ साहित्यीक भगवान भटकर,जेष्ठ हिंदी भाषा तज्ञ व अभ्यासक प्रा.डॉ. पुरुषोत्तम पाटील,जेष्ठ समाजसेवक शिवराम पाटील, माजी प्राचार्य प्रा.अजित वाघ,कवी प्रफुल्ल पाटील, कवी मीनाताई सैदाने, प्रा. नारायण पवार व इतर काव्य रचनाकार काव्य रसिक व साहित्यिक हजर होते.