विद्यार्थी हितासाठी काम करणार – कमेटी अध्यक्ष – योगेश माळी
जळगाव – (प्रतिनिधी)-कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू)2022/23 ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
मासु महाराष्ट्रभर तळागळातील सर्वसामान्य विद्यार्थांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी एक अराजकीय संघटना आहे. विद्यार्थी हित हेच एकमेव मासूचे अंतिम ध्येय आहे. आज विविध ठिकाणी शिक्षणासाठी लाखो रुपये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भरावे लागतात, व तरी सुद्धा तळागळातील सर्वसामान्य विद्यार्थांना समाधान कारक योग्य शिक्षण मिळत नाही.
हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी मासू कार्यरत आहे. आज विद्यार्थी हित लक्षात घेऊन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी विद्यापीठातील विविध विद्यार्थांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कमेटी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ॲड. दिपक ए. सपकाळे व जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष म्हणून योगेश माळी यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी शूभाष पाटील, प्रवीण देशमुख, रितेश भारंभे महिला प्रतिनिधीपदी:- वर्षा सगने, तेजस्विनी श्रीखांदे कोमल करहाळे सचिवपदी:- चेतन वाघे सहसचिव:- जितेंद्र शिरसागर भूषण बेदरे संघटकपदी:- गौरव निकम, ऋतिक महाले, विकास पाटील राहुल सुर्यवंशी. मीडिया समन्वयकपदी:- प्रेम वाकळे आदींची निवड करण्यात आली. यावेळी मासूचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ॲड. दिपक ए. सपकाळे, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन व जिल्हा सचिव प्रथमेश मराठे विविध विभागांमधील विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.