<
भडगाव-माऊली फाऊंडेशन भडगाव यांच्या वतीने भडगाव शहर व तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.त्याअनुषंगाने भडगाव येथे माऊली फाऊंडेशन भडगाव व गोदावरी फाऊंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य-दिव्य आरोग्य शिबिर पार पडले.आरोग्य हीच धनसंपत्ती असुन नागरिकांचे आरोग्य सदृढ राहवे.त्यांच्या आजारांवर योग्य निदान होऊन योग्य उपचार व्हावा.हा एकमेव उदात्त हेतु डोळ्यासमोर ठेऊन सदर आरोग्य शिबिराचे नियोजन करण्यात आले होते.
अशा प्रतिक्रिया माऊली फाऊंडेशनचे स्वयंसेवक जाकिर कुरैशी यांनी आमच्या प्रतिनिधींजवळ व्यक्त केल्या.सदर आरोग्य शिबिरात 385 रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यांत नाक,कान व घसा,महिलांचे विविध आजार,मुतखडा,कँन्सर,टुडी ईको,ई.सी.जी.हाडांचे आजार,मधुमेह,हृदयविकार अशा विविध आजाराने त्रस्त रुग्णांपैकी 130 रुग्णांना पुढील उपचारांसाठी संदर्भीत केले असुन ह्या सर्व रुग्णांवर पुढील उपचार मोफत केले जाणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माऊली फाऊंडेशनचे उपाध्यक्ष युवराज सुर्यवंशी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन भडगाव येथील पोलिस निरिक्षक अशोक उतेकर होते.
तसेच भडगाव शहरातील सर्व पत्रकार बांधव आवर्जुन उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात आरोग्याची देवता धन्वंतरी यांच्या प्रतिमा पुजनाने होऊन कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांचा माऊली फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित असलेले भडगावचे पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना माऊली फाऊंडेशन व गोदावरी फाऊंडेशनचे कौतुक करुन नागरिकांच्या आरोग्याविषयी आरोग्य शिबिर राबवुन आपण समाजाचे काही देणं लागतो.हा उदात्त हेतु डोळ्यासमोर ठेऊन केलेल्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.गोदावरी फाऊंडेशनचे डाँ.महेश देशमुख यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की गोदावरी फाऊंडेशनच्या माध्यमातुन जिल्ह्यात नेहमी आरोग्य शिबिरांचे आयोजन करुन नागरिकांना चांगल्या प्रकारची आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न केला जातो.कार्यक्रमप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे डाँ.महेश देशमुख,डाँ.जीवक,डाँ.चाणक्य,डाँ.सेजल मुश्यफ,डाँ.रितु रावल,डाँ.अंजली,अमिन तडवी व त्यांची संपुर्ण टिम उपस्थित होती.तसेच माऊली फाऊंडेशनच्या संचालिका संगिता जाधव यांच्यासह माऊली फाऊंडेशनचे सर्व पुरुष व महिला स्वयंसेवक उपस्थित होते.लाईफ केअर पँरामेडिकल काँलेजचे रियाज मुनाफ खाटीक,शोएब मिर्झा,अझर वासिफ खतीब व त्यांचे सहकारी उपस्थित होते.कार्यक्रमास मोहसीन शेट खाटीक,कुरैशी साबीर सर यांचे विशेष सहकार्य लाभले.सदर आरोग्य शिबिर अतिशय चांगल्या प्रकारे पार पडल्यामुळे नागरिकांनी माऊली फाऊंडेशन भडगाव व गोदावरी फाऊंडेशन जळगाव यांचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमाची प्रस्तावना संजय सोनार कळवाडीकर यांनी केली. सुत्रसंचलन गणेश पाटील यांनी केले.आभार प्रदर्शन जाकिर कुरैशी यांनी केले.