<
भडगांव (प्रतिनिधी) : आपल्या परिसरास वरदान असलेली गिरणा नदी सतत दुथडी भरून वाहत आहे. दमदार पावसामुळे गिरणा धरण सलग यावर्षीही शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामाचा सिंचन प्रश्न सुटल्याने शेतकरी वर्ग आनंदित आहे.
पो.स्टे.दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील, उपाध्यक्षा मिना बाग, कल्पना पाटील, निता पाटील, छाया पाटील, वर्षा देशमुख, भाग्यश्री सोनवणे, नयना वाजपेयी, सुमित्रा मौर्य आदि महिलांनी कोजागिरी पोर्णिमा भुलाबाई दुर्गोत्सव निमित्त गिरणा नदीचे जलपुजन केले. साडी खण श्रीफळ सह ओटी भरून परिसर सुजलाम् सुफलाम् उत्तम आरोग्यसाठी प्रार्थना केली.