<
लोहारा. ता. पाचोरा रिपोर्टर- ( ईश्वर खरे ) येथील प्रगतिशील शेतकरी चिंधू विठ्ठल चौधरी ह्यांच्या शेतात तुलसी सिड्स प्रायव्हेट लमिटेड गुंटूर कब्बडी बीजी टु या वणीची पीक पाहणी व चर्चासत्र नुकतेच संपन्न झाले
यावेळी तुलसी सीड्सचे एरिया मॅनेजर अनंत वराडे, अरुण शिरसाठ, सदानंद ताठे, विश्वास साबळे,सचिन शेळके, तंटामुक्ती अध्यक्ष अमृत चौधरी,ज्योती कृषी केंद्राचे संचालक राहुल कटारिया, शांताराम चौधरी, उदय कृषी केंद्राचे संचालक बापू देशमुख, सत्यम कृषी केंद्राचे संचालक विजय जैन, किसन पाटील, राजेंद्र जैन, दत्तू राठोड, डॉ. बाळू जैन, सुरेश चौधरी, अशोक माळी, ईश्वर देशमुख, गोपाल पांढरे, इत्यादी. मान्यवर उस्थितीत होते.
यावेळी एरिया मॅनेजर अनंत वराडे ह्यांनी पीक व्यवस्थापन,खत व्यवस्थापन, बोंड अळी ह्याबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शेतकरी चींधू विठ्ठल चौधरी यांच्या शेतात पीक पाहणी करण्यात आली. लोहारा परिसरात प्रथमच कपाशीच्या झाडाला १४७ बोंडे आल्याने शेतकऱ्यांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. कब्बडी या वाणीतून एकरी १६ क्विंटल कापूस येण्याची शक्यता आदर्श शेतकरी चींधू विठ्ठल चौधरी यांनी व्यक्त केली आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांचे आभार आदर्श शेतकरी चींधू विठ्ठल चौधरी यांनी मानले.