Wednesday, July 9, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विश्व मानक दिनाच्या औचित्याने मुंबई येथील कार्यक्रमात पहिले परवानाधारक म्हणून जैन इरिगेशनचा गौरव

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/10/2022
in जळगाव, विशेष
Reading Time: 1 min read
भारतीय मानक ब्युरोतर्फे तारापूर अणूऊर्जा केंद्राचे केंद्र संचालक डॉ. संजय मुलकलवार यांच्या हस्ते जैन इरिगेशनचा सन्मान स्वीकारताना कंपनीचे वरिष्ठ सहकारी डॉ. जनमेजय नेमाडे आणि श्री. सुकुमार

मुंबई , दि. 14 (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनच्या इंजेक्शन मोल्डींग एचडीपीई फिटींग विभागाने भारतात पहिले आयएस 8008 चे परवानाधारक म्हणून मानांकन घेतले होते. या कार्याला अधोरेखित करत विश्व मानक दिनाच्या (14 ऑक्टोबर) औचित्याने भारतीय मानक ब्युरोने गौरव केला. मुंबई येथील हॉटेल मेलुदा द फर्न येथे रोजी जैन इरिगेशनचा सन्मान कंपनीचे वरिष्ठ सहकारी डॉ. जनमेजय नेमाडे आणि श्री. सुकुमार यांनी कंपनीच्या वतीने स्वीकारला. तारापूर अणूऊर्जा केंद्राचे केंद्र संचालक डॉ. संजय मुलकलवार यांच्या हस्ते हा गौरव प्रदान केला गेला.

जागतिक मानक दिन दरवर्षी 14 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. भारतीय मानक ब्युरो पश्चित क्षेत्रीय कार्यालय मुंबईतर्फे बीआयएस मानक चर्चासत्र व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी ‘Standards for sustainable Development Goals – A Shared Vision for a Better World’ अर्थात ‘सतत विकार लक्ष्यों के लिए मानक बेहतर विश्व हेतु साझा दृष्टिकोण’ असा विषय होता. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश ग्राहक, नियामक आणि उद्योगांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेच्या मानकीकरणाबद्दल जागरूकता वाढवणे आहे. जागतिक मानक दिन पहिल्यांदा 1970 मध्ये साजरा करण्यात आला. ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ही राष्ट्रीय मानके ठरवणारी भारतातील पहिली भारतीय मानक संस्था आहे, ज्याची स्थापना 1947 मध्ये झाली. बीआयएस तर्फे रसायन, चिकित्सा उपकरण आणि हॉस्पीटल्स, सिव्हील इंजिनयरिंग, धातूकाम, इंजीनियरिंग, विद्युत तंत्रज्ञान, पेट्रोलियम, कोळसा आणि संबंधित उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स व सूचना प्रौद्योगिकी, उत्पादन व सामान्य इंजीनियरिंग (Production and General Engineering), खाद्य व कृषि, कपड़ा (Textile), जल संसाधन इत्यादि क्षेत्रांसाठी मानक देण्यात येतात.

जैन इरिगेशनने भारतात आयएस 8008 मानकाचा पहिला परवाना घेतला याबाबत कार्यक्रमातील त्यांच्या सादरीकरणात विशेष उल्लेख करण्यात आला होता. जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय मोठ्याभाऊंनी अर्थात भवरलालजी जैन यांनी दूरदृष्टीतून हे कार्य उभारलेले आहे त्यांच्या विचार व वारश्याची पुढेही वाटचाल सुरू आहे हे विशेष.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

पालकमंत्र्यांच्या हस्ते पाळधीला ‘स्वच्छ भारत 2.0 अभियानाचे उद्घाटन

Next Post

देशमुख महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘चला जाऊ नियतकालिकांच्या भेटीला’

Next Post

देशमुख महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त 'चला जाऊ नियतकालिकांच्या भेटीला'

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications