<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथे पूज्य अमर शहीद संत कवरराम साहेब यांच्या ६५ व्या वरसी उत्सव , पूज्य संत बाबा हरदासराम साहब ( गोदडीवाले ) यांच्या ४५ व्या वरसी उत्सव व पूज्य ब्रह्मस्वरुप बाबा गेलाराम साहब यांच्या १४ व्या वरसी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन सिंधी सेवा मंडळ जळगाव यांच्या मार्फत दिनांक १४ व १५ ऑक्टोबर २०२२ या दिवशी करण्यात आले. दर वर्षी सिंधी सेवा मंडळ यांच्या मार्फत पूज्य संत कवरराम यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात येते. सदर वरसी महोत्सवात संपूर्ण भारतातून सिंधी समाजातील सर्व बांधव गण जळगाव येथील सिंधी सेवा मंडळ येथे होत असलेल्या वरसी महोस्तवात सहभाग नोंदवत असतात.
सिंधी सेवा मंडळामार्फत विविध सामाजिक उपक्रम नेहमीच राबविले जातात. यातीलच अत्यंत महत्वाचा उपक्रम म्हणजे रक्तदान शिबीर होय. वरसी महोस्तवात दर वर्षी सिंधी सेवा मंडळाच्या मार्फत रक्तदान शिबिराचे अयोजन माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र जळगाव यांच्या सहकार्याने करण्यात येत असते. यावर्षी दि. १४ व १५ ऑक्टोबर २०२२ यादिवशी झालेल्या महोत्सवातही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात संपूर्ण भारतातून आलेल्या भक्तांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले. पूज्य संत कवरराम यांच्या ६५ व्या जयंती निमित्त एकूण ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले व गरजू रुग्णांना मदत केली. सदर रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी सिंधी सेवा मंडळाच्या सर्व सेवाधारी तसेच माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र जळगाव च्या कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सिंधी सेवा मंडळाचे सेवाधारी कार्यकर्ते नेहमीच रक्तदान विषयात अग्रेसर असतात तसेच सिंगल डोनर प्लेटलेट्स डोनेशन विषयातही मंडळाच्या सेवाधारी तरुणांचा उल्लेखनीय सहभाग असतो.