<
भडगाव: आज दी 14 रोजी दुपारी येथिल सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव जि. जळगाव येथील भूगोल विभागाद्वारे भौगोलिक विषयांवर आधारित पोस्टर प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ज्यात जागतिक तापमान वाढ, भूगोलाचे साहित्य, भारतील वने, पर्यटन, प्रदूषण, जल संवर्धन, वायू संवर्धन, नायट्रोजन चक्र, लोकसंख्या विस्फोट, हरितगृह परिणाम, सुदूर संवेधन, भूरूपे अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी पोस्टर तयार केले होते. या स्पर्धेत एकूण ८२ विद्यार्थांनी सहभाग नोंदविला. त्यातील द्वितीय वर्ष कला ची विद्यार्थिनी उज्ज्वला पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय व तृतीय क्रमांक प्रथम वर्ष विज्ञान च्या विद्यार्थिनी अनुक्रमे दामिनी पाटील व आशाद मिर्झा यांनी पटकाविला.
या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी भूशविले. स्पर्धेचे उद्घाटन हे समर्पण हॉस्पीटल चे डॉ. निलेश पाटील यांनी केले. तर प्रमुख अतिथी म्हणून कै. ब.चौ.उम विद्यापीठ चे अधिसभा सदस्य ऍड. अमोल नाना पाटील व महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एस. आर. पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. निलेश पाटील यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थांचे कौतुक केले व प्राचीन काळापासून भारतात भौगोलिक ज्ञानाचे भांडार किती संपन्न होते याची विविध उदाहरणे देऊन विषद केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.एन.गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थांनी चित्ररुपात प्रदर्शित केलेल्या संकल्पनांचे कौतुक करून हे ज्ञान विद्यार्थांनी जीवनात अनुसरण्याच्या सूचना केल्या. कार्याक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. डी. भैसे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डी. ए. मस्की यांनी केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. आर. बी. वाळवी एस. एस. एम. एम. महाविद्यालय, पाचोरा व प्रा. डॉ. जी. डी. चौधरी यांनी काम केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ. एस. डी. भैसे, प्रा. डी. ए. मस्की व प्रा. मोहनदास महाजन यासोबतच भूगोल विभागातील द्वितीय व तृतीय वर्ष कला व प्रथम वर्ष विज्ञान च्या विद्यार्थांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.