<
जळगाव – (प्रतिनिधी) – भारतीय डाक विभागातर्फे “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त” ९ ते१२ ऑक्टोबर”भारतीय पोस्ट सप्ताह ” साजरा करण्यात आला.या निमित्त ए.टी.झांबरे विद्यालयाच्या इ.५ वी.च्या विद्यार्थ्यांनी मुख्य पोस्ट ऑफिस ला भेट दिली.या प्रसंगी मुख्य पोस्ट मास्तर या.श्री.एस.एम.कुलकर्णी यांचे श्री.बी.डी.झोपे सरांनी व. सहाय्यक पोस्ट मास्तर मा.श्री.ललित बोरकर यांचे श्रीमती.एस.एम.शिरसाठे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी श्री.कुलकर्णी साहेबांनी पोस्ट सप्ताह चा उद्देश व त्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.तसेच स.पो.मा.श्री.ललित बोरकर यांनी भारतीय डाक विभागाच्या स्थापनेपासून आतापर्यंत झालेल्या आधुनिक बदला संबंधी व भारतीय डाक विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.या कार्यक्रमास श्रीमती.एम.वाय. ठोसरे,व श्री.आर.एन तडवी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार श्री.ई.पी.पाचपांडे सरांनी मानले.