<
भडगांव-(प्रतिनिधी) – येथील लाडशाखीय वाणी समाज मंडळाच्या वतीने नुकताच भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने समाजातील 75 वर्ष व त्यापुढील वयाच्या स्रीया व पुरुषांचा सन्मान सोहळा दि.१६-१०-२०२२ वार- रविवार या रोजी आयोजित केला होता.त्यात तब्बल चार दांपत्य, तेरा पुरुष व २० स्त्रिया असे एकूण ३७ अमृत महोत्सवींची नोंद करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे ज्येष्ठ संचालक तथा खजिनदार श्री.सुरेश धोंडू येवले व सौ.अरुणा सुरेश येवले हे होते. तर व्यासपीठावर सर्व पदाधिकारी व संचालक उपस्थित होते. कार्यक्रमाला दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने सुरुवात करण्यात आली. स्वागत गीत कु.रिद्धी व सिद्धी मोराणकर यांनी म्हटले. तर प्रास्ताविक सहसचिव एन.के.सोनजे यांनी केले. उपस्थित असलेल्या काही सभासदांनी मनोगत व्यक्त केले.
त्यात दिनेश सोनजे सर यांनी या सोहळ्यानिमित्त संचालकांना धन्यवाद दिले. तर सौ.अरुणा शेंडे संचालिका यांनी मनोगतातून या दादा दादींचे आपल्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार आहेत म्हणूनच आपणही त्यांचे काहीतरी देणे लागतो म्हणून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला,असे मत व्यक्त केले. व ऍड.आर.के.वाणी यांनी त्यांच्या मनोगतात या वृद्ध माता-पित्यांची या वयात कोणत्याही मुलाने ताटातूट होऊ देऊ नका. त्यांच्या संस्कारात नीती मूल्यांचा उपयोग करून घ्या. हा अनमोल सल्ला दिला. तर सेवानिवृत्त प्राध्यापक जी.झेड.वाणी सर यांनी असा कार्यक्रम होणे म्हणजे नवीन पिढीला संस्काराचे महत्त्व पटवून देणे असेच म्हणावे लागेल, असे मत प्रगट केले. यावेळी सत्कार प्रसंगी प्रत्येकी शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व डिजिटल फोटो फ्रेम देऊन सन्मानित करण्यात आले.त्याच बरोबर उपस्थित असलेल्या समाज बांधवांना माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक गणेश हरी मालपुरे यांनी स्वखर्चातून सुरुची भोजनाची व्यवस्था करून दिली. त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा येथोच्छ सन्मान करण्यात आला. उपस्थित समाज बांधवांनी मंडळाचे भरभरून कौतुक करीत भावी उपक्रमांसाठी सदिच्छा दिल्या. कार्यक्रमाचा समारोप व आभार मंडळाचे सचिव एल.के.वाणी सर यांनी मानले व राष्ट्रगीताने सांगता झाली.