<
महाराष्ट्र स्टुडंट्स युनियननचे प्राथमिक सदस्य व बेरोजगार नोंदणी अभियान सुरु ! मासूचा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्द…
मासूच्या मुंबई प्रदेशचे नेतृत्व श्री. विकास शिंदे तर औरंगाबाद जिल्ह्याचे श्री. नजीब फारुकी आणि भिवंडी व कर्जत तालुक्याचे नेतृत्व अनुक्रमे अॅड. पूजा टाळे व अॅड. क्रांती अभंगे यांच्याकडे सोपविण्यात आले.
मासूचा ३ रा स्थापना दिवस दिनांक १५ ऑक्टोबर, २०२२ रोजी डोंबिवली येथील वैशालीताई जोंधळे सभागृह येथे हर्षो- उल्लासात, शेकडो उपस्थितांच्या साक्षीने पार संपन्न झाला. मासुचे महासचिव अॅड. प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली तालुका कमिटीने अपार मेहनत घेऊन हा स्थापना दिवस संस्मरणीय केला. या सोहळ्याला जळगाव, धुळे नंदुरबार,औरंगाबाद, अमरावती, नाशिक,ठाणे ,भिवंडी, विरार, रायगड, वाडा , कर्जत, येथून मासुचे पदाधिकारी आणि सहकारी या सोहळ्यास उपस्थित होते
याप्रसंगी तीन वर्षात पहिल्यांदाच प्राथमिक सदस्य नोंदणी सुरु करण्यात आली असून मुख्यत्वे बेरोजगारांची नोंदणी ह्या उपक्रममाचे अनावरण प्रमुख अतिथी अॅड.जमशेद मिस्त्री यांच्या हस्ते तसेच मासूची मोहीम, ध्येय,भूमिका व पुढील दिशा विद्यार्थ्यांना व तरुणांना समजण्यासाठी मासूच्या जाहीरनाम्याचे अनावरण विशेष अतिथी अॅड. मोहिनी प्रिया यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याच्या अनुषंगाने पदवाटप सुद्धा करण्यात आले असे कि मासुचे मुंबई प्रदेश अध्यक्षपदी श्री. विकास शिंदे, औरंगाबाद जिल्हा निरीक्षक श्री. नजीब फारुकी आणि भिवंडी व कर्जत तालुका अध्यक्ष म्हणून अनुक्रमे अॅड. पूजा टाळे व अॅड. क्रांती अभंगे यांची नियुक्ती करण्यात आली.
विशेष अतिथि श्रीमती. मोहिनी प्रिया (अधिवक्त्या – सर्वोच्च न्यायालय) यांनी आपले अध्यक्षीय भाषण करताना मासुच्या कार्याची प्रशंसा केली व त्या म्हणाल्या कि मी इथून जाताना मासुची होऊन चालली आहे ! असे उदगार काढले.
शिक्षणतज्ज्ञ श्री. श्याम सोनार यांनी आपल्या मार्गदर्शनातून “एक बनो, नेक बनो, मासुके सैनिक बनो” या घोषणेचा उद्य केला तसेच इतर प्रमुख अतिथी adv. जमशेद मिस्त्री,जेष्ठ पत्रकार श्री. विनोद कुमार मेनन, शिक्षणतज्ञ श्री. श्याम सोनार, adv . रशीद खान आणि जोंधळे एडुकेशन ग्रुपचे श्री. सागर जोंधळे व सर्वेसर्वा श्रीमती वैशाली जोंधळे या सर्वांच्या उपयुक्त मार्गदर्शनाने सोहळ्याची शान तर वाढलीच परंतु वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून “काय भारतीय नागरिकांना शिक्षणाचा व रोजगाराचा मूलभूत अधिकार आहे का?” या उपस्थित केलेलया प्रश्नाने प्रेक्षक,विद्यार्थी,तरुण यांना विचार करायला भाग पाडले.
मासुच्या ३ स्थापना दिवसाचे औचित्य साधून गुणवंत पत्रकार, विद्यार्थी नेते तसेच शिक्षक व प्राध्यापकांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल गौरवण्यात आले.
पुरस्कारप्राप्त केलेल्या सर्वानी आपल्या मनोगतामध्ये व्यवस्थेचे वास्तव मांडून राजकीय व सामाजिक व्यवस्था परिवर्तनाचे कार्य जलदगतीने होणे अपेक्षित आहे असे मत मांडले .
पत्रकार – श्री.सोहित मिश्रा – NDTV , श्री. वेंदात नेब – ABP,माझा, श्री. ब्रिजमोहन पाटील – सकाळ वृत्तपत्र, पुणे, श्रीमती. पल्लवी स्मार्त – Indian Express.
सर्वोत्तम विद्यार्थी नेता – श्री.रोहन महाजन – महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन , श्री. रोहित ढाले – छात्र भारती
सर्वोत्कृष्ट कार्य – विद्यार्थी चळवळ -अॅड. सुनील तोतावड, आनंदराज घाडगे, अॅड. रोशन पाटील, प्रतीक टेम्भूर्णे, अक्षय जाधव, नारायण खरात, दीपक वानखेडे, प्रतीक जाधव.
विशेष सत्कार – शिक्षक व प्राध्यापक – डॉ. संतोष कांबळे, श्री. नितीन घोपे, श्री. महेश पाटील, विनोदकुमार भोंग.
मासुचे कार्याध्यक्ष अॅड. सुनील देवरे यांनी उपस्थितांना स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देऊन पुरस्कारप्राप्त विजेत्यांचे अभिनंदन केले तसेच संस्थापक अध्यक्ष अॅड.सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांनी पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार प्रकट करताना तरुणांनी सामाजिक जबाबदारी आणि नैतिक कर्तव्ये डोळ्यांसमोर ठेवून व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्यात सहभागी होण्याची गरज आहे असे मत मांडले.
३ रा स्थापना दिवस सोहळा संस्मरणीय करण्यासाठी कल्याण डोंबिवली तालुका अध्यक्ष श्री. रोहित म्हस्के, उपाध्यक्ष श्री. आकाश हिवाळे, चंद्रमणी कनोजिया, अनिकेत हिवाळे, संगम जाधव, आदर्श गुप्ता, सारंग राठोड, तुषार शिंदे, विनीत रावल, रुचित शेट्टे, प्रेम मोहिते, निर्भय तायडे, चिराग मोटे, नरपट कुमावत, नोमान खान, सुजल कांबळे , सलमान अन्सारी या तरुणांच्या अपार मेहनतीचे तोंडभरून कौतुक व सत्कार संस्थापक अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ इंगळे यांच्याहस्ते करण्यात आला.