<
जळगाव – (प्रतिनिधी) – ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव आणि गुरुवर्य प वी पाटील विद्यामंदिर जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अध्यापक प्रबोधिनी अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि शिक्षकांसमोरील आव्हाने या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
सदर व्याख्यानासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव (डाएट) चे प्राचार्य डॉ अनिल झोपे उपस्थित होते. व्याख्यानादरम्यान डाॅ अनिल झोपे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची पार्श्वभूमी ,शिक्षण हक्क, शैक्षणिक योजना, शिफारशी, अंमलबजावणी, मुल्यमापन पध्दती, अध्ययन अध्यापन ,समाज, संस्था, प्रशासन आणि त्यात अंतर्भूत घटकांची सांगोपांग चर्चा करून मार्गदर्शन केले.
प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे, मुख्याध्यापिका सौ रेखा पाटील, पर्यवेक्षक श्री नरेंद्र पालवे, तसेच दोन्ही विद्यालयातील शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.