<
विजबिल भरगच्च अन् सेवा मात्र तुच्छ
वरणगांव -(प्रतिनीधी) येथे विज गुल होण्याचा प्रकार नित्याचाच झालेला आहे. कधी १० मिनिटे तर कधी १० तास जनतेच्या हिताची महाविजवितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना काहिच घेणे – देणे नाही असा अनुभव नित्यनेमाने वरणगांव वासियांना येत आहे. सविस्तर असे की, वरणगांव हे नगरपरिषद होऊन ४ ते ५ वर्ष होत आली पण अजुन सिद्धेश्वर नगर व तेथील नवीन प्लॉट परिसर येथे विजेची समस्येला दररोजच सामोरे जावे लागत आहे. याठिकाणी पाऊसाच्या विजा जरी कडाडल्या तरी विज गुल होत असते. पाऊस अतिशय संथ सुरु असुन देखील विज गुल कशी होते. तर याला विजवितरण विभागाचा भोंगळ व नियोजन शुन्य कामच म्हणावे लागेल. एकीकडे चोरी, दरोडे पडत आहेत आणि ईकडे मात्र रात्र – रात्र भर विज गुल असते.
अंधाराचा फायदा घेऊन काही बरे-वाईट घडण्याची शक्यता जास्त असते. मग असे काही घडल्यास महाविजवितरण च्या अधिकार्यांना व कर्मचारी यांना जबाबदार म्हणायचे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाविजवितरण विभागाचे वायरमन नेमका पगार कसला घेताय? ईथे डीपी वरुन लाईट गेली तर स्थानिक लोकच तिथे जिव धोक्यात टाकुन दुरुस्ती करतांना दिसुन येतात. विजबिल लोकांना भरगच्च येत असते, पण सेवा मात्र तुुच्छ मिळत असते.
महाविजवितरण च्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर नियंत्रण नसल्याने अशा बेजबाबदार पणाने काम सुरू असल्याची सर्वदूर चर्चा आहे. त्यामुळे अखेर असेच म्हणावे लागेल “पाऊस कुल, अन् विज गुल”.
या परिसरातील विजेची समस्या कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. खर तर यांना ग्राहक न्यायालयातच खेचले पाहिजेे. विज बिल लेट झाले तर लगेच वायरमन येवुन विज कनेक्शन कट करतो. पण विज गेल्यावर कुणिच फिरकत नाही. यावरून कर्मचारी किती कर्तव्य दक्ष आहेत याचे दर्शन जनतेल होत आहे.