<
जळगाव – (प्रतिनिधी) – आजच्या तरूणाईने प्रविण शिंदे सारख्या युवकाचा आदर्श नजरेसमोर ठेवून वाटचाल करण्याची गरज आहे. दिनांक २१ रोजी प्रविण शिंदे यांचा जन्म दिवस पार पडला, खरतर अलिकडे वाढदिवस साजरा करण्याच्या नवनवीन संकल्पना आज कालची तरूणाई अवलंबताना दिसून येते. पण आपल्या जन्मदिनी. प्रविण शिंदे यांनी आपण समाजाचे देणं लागतो या भावनेतून विचार करत समाजासमोर जणू एक आदर्शच निर्माण केला. जिल्हयातील विविध आदिवासी पाळ्यांवर जावून तसेच अनेक सेवाभावी संस्थांना भेटी देऊन प्रविण शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने फराळ वाटपाचा यशस्वी उपक्रम राबविला.
प्रविण शिंदे हा तरुण एक सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी असुन त्याच्या या आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याच्या उपक्रमाचे सर्वत्रच कौतुक केले जात आहे. व आपण ही यापुढे “केक’ न कापता अशा प्रकारे वाढदिवस साजरा करू असा संकल्पच जणू तरूणाई करतांना दिसून येत आहे.
यावेळी आपल्या विद्यार्थ्याच्या या यशस्वी उपक्रमाला प्रतिसाद देत प्राध्यापकांनीही त्याचे मनोबल वाढविण्यासाठी यात सहभाग नोंदवला. यावेळी क. ब. चौ उमवी जळगांव. विद्यापीठाचे समाजकार्य विभागातील. प्रा. डॉ दिपक सोनवणे, प्रा.विनेश पावरा, प्रा सुनिल गिरासे तसेच समाजकार्याचे विद्यार्थी उपस्थित होते.