<
जळगाव – (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज जळगाव शहरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या वतीने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत क्लीन्लीनेस मेगा ड्राईव्ह राबविण्यात आला त्यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक संकलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस जी.एस. ग्राउंड येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सचिन नांद्रे आणि विभागीय समन्वयक डॉ. नितीन बडगुजर यांच्या वतीने उपस्थित स्वयंसेवकांना प्लास्टिक मुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान याबद्दल माहिती देण्यात आली त्यात स्वयंसेवकांना आवाहन करण्यात आले की, प्लास्टिक वापरामुळे दैनंदिन जीवनामध्ये अशा अनेक बाबी आहेत ज्या दृष्टीस पडत नाही परंतु त्यामुळे निसर्गाचे आणि पर्यावरणाचे अपरिमित नुकसान होते.
राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने तसेच राज्य संपर्क कार्यालय यांच्यावतीने व केंद्र शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनानुसार प्लास्टिक संकलनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला हे सांगतांना राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक म्हणून ही आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. याप्रसंगी त्यांनी प्रति स्वयंसेवक कमीत कमी दीड किलो प्लास्टिक संकलित करावे असे सांगून सदर संकलित झालेले प्लास्टिक महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे पुढील विल्हेवाट करणे साठी देऊन देऊन त्याबाबत तशा स्वरूपाचे प्रमाणपत्र प्राप्त करावे असे आवाहन केले. विभागीय समन्वय डॉक्टर नितीन बडगुजर यांनी बोलताना असे सांगितले की सदर मोहीम ही केवळ एका दिवसापुरता न राबविता प्रत्येक घराघरातून ही मोहीम राबवली जावी व या मोहिमेची सुरुवात आपल्या स्वतःपासून करावी असे आवाहन यावेळी केले.
याप्रसंगी जळगाव शहरातील सर्व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककातील स्वयंसेवकाच्या वतीने या मोहिमेस प्रारंभ झाला. सुरुवात जी.एस ग्राउंड पासून करण्यात आली जी.एस. ग्राउंड परिसर, शिवाजी पुतळा परिसर, परिसरात रस्त्यांवर असलेले प्लास्टिक तसेच सदर परिसरात रहिवास असलेले कुटुंबांना आवाहन करून त्यांच्याकडील टाकाऊ प्लास्टिक जमा करण्यात आले. याशिवाय गोलाणी मार्केट परिसरात देखील सर्व गाळेधारकांना आवाहन करून त्यांच्याकडून देखील प्लास्टिक जमा करण्यात आले. मार्केट परिसरात इतरत्र पडलेले प्लास्टिक पिशव्या, रिकाम्या झालेल्या बाटल्या तसेच इतर प्लास्टिक साहित्य जवळपास 334 स्वयंसेवकांच्या वतीने जमा करण्यात आले. या मोहिमेमध्ये जळगाव शहरातील मु.जे महाविद्यालय जळगाव, नूतन मराठा महाविद्यालय जळगाव, अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव, शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय जळगाव, एस एस मनियार विधी महाविद्यालय जळगाव, इकरा संस्थेचे एच जे थीम महाविद्यालय जळगाव व इतर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककांनी सहभाग घेतला. संपूर्ण मोहिम राबविण्यासाठी लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विभागीय समन्वयक डॉक्टर नितीन बडगुजर यांनी समन्वयक म्हणून काम केले.त्यांचे समवेत ही मोहीम यशस्वी करण्यासाठी लोकसेवक मधुकरराव चौधरी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश चौधरी, डॉ. भारती गायकवाड डॉ. अशोक हनवते, शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयाचे डॉक्टर मिलिंद काळे, डॉ. लढे मु.जे महाविद्यालयातील डॉ. वसावे, डॉ देशमुख, अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महाविद्यालयातील प्रा. डॉ. किनगे, डॉ. राजपूत मॅडम, एस एस मणियार विधी महाविद्यालयाचे डॉ. धुमाळे सर याशिवाय इकरा एच.जे.थीम महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजीव गवारे, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्रा. डॉक्टर पी.बी. पाटील, डॉ. अण्णासाहेब जी डी.बेंडाळे महाविद्यालयाचे डॉ. बेलसरे सर व जवळपास 334 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. स्वच्छता मोहिमेमध्ये गोलाणी मार्केट परिसर, जळगाव शहर महानगरपालिका परिसर, नेहरू चौक परिसर, रेल्वे स्टेशन वरील सर्व प्लॅटफॉर्म प्लास्टिक मुक्त करून स्वच्छ करण्यात आले. याशिवाय खान्देश सेंट्रल परिसरात देखील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलित करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय येथील माननीय जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून स्पेशल ड्युटी ऑफिसर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिनंदन केले याशिवाय जळगाव शहर महानगरपालिकातील प्रकल्प अधिकारी गायत्री पाटील यांनी देखील भेट देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्रीताई महाजन यांनी देखील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या सदर मोहिमेस शुभेच्छा दिल्या. सदर मोहिमेसाठी कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ व्ही.एल. माहेश्वरी प्र.कुलगुरू डॉ. एस टी इंगळे,कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. संचालक डॉ. सचिन नांद्रे यांचे नेतृत्वात सदर मोहिमेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.निलेश चौधरी यांनी केले.