<
सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ‘मॅसिव्ह प्लास्टिक कलेक्शन डे’ निमित्त व ‘क्लिन इंडिया कँम्पेन’ अंतर्गत प्लास्टिक कचरामुक्त अभियान राबविण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसर, भवानी बाग परिसर, तसेच पिंपरखेड येथील पारेश्वर मंदिराचा परिसर अशा विविध ठिकाणी प्लास्टिक कचरा निर्मूलन मोहीम राबविली. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवकांकडून प्लास्टिकचा कचरा संकलित करण्यात आला व तो नगरपालिकेच्या कचरा डेपोमध्ये जमा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डाॅ.एन.व्ही. चिमणकर, साहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. ए. मस्की यांनी यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.