<
जळगाव – (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासन ग्रामविकास व केंद्र शासनाच्या संयुक्त पणे राबविण्यात येणाऱ्या योजनाअंतर्गत पंडीत दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजने अंतर्गत कुमार एज्युकेशन सोसायटीचे जळगाव येथील प्रशिक्षण बॅच चे उद्-घाटन प्रसंगी ग्रामीण भागातील 18 ते 35 वयोगटातील तरूण, तरुणीनी प्रशिक्षणात सहभाग नोंदवावा असे आवाहन सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी राहूल इधे यांनी केले .सदरील फायबर ऑप्टीक प्रशिक्षण बॅचचा उद्-घाटन प्रसंगी राज्य अभियान व्यवस्थापक किरण पाटील , उमेद चे जिल्हा व्यवस्थापक हरेश्वर भोई , सेंटर मॅनेजर श्रृती चौधरी , सुमीत पाटील, दहिवाल आदि उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या महत्त्वकांशी योजना पैकी एक असणारी पंडीत दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेचे व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण भागासाठी आहे . सदरील योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरिबातील गरीब कुटूंबातील 18 ते 35 वयोगटांतील तरूण / तरुणी यांना विनामुल्य विविध निवासी प्रशिक्षण 3 महिने ते 6 महिने कालावधी दरम्यान कोर्ससेस चा माध्यमातून प्रशिक्षित करून त्यांना विविध माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येत असतो ! राज्यभरात पंडीत दिनदयाल उपाध्याय योजनेसाठी हजारो मुलं / मुली प्रशिक्षण घेवून , रोजगारक्षम होवून स्वतः सक्षम होवून आपल्या कुटूंबियांना सक्षम बनवत आहे ! ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनाचे मंत्री मा . ना . गिरीषभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाअंतर्गत , ग्रामविकास विभागाचे अप्पर मुय्ख सचिव राजेश कुमार मीना, पंडीत दिनदयाल उपाध्याय योजनेचे मुय्ख परिचालन अधिकारी विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील हजारो तरूण तरुणी सदरील प्रशिक्षण योजनेचा लाभ घेत आहे ! व विविध नामांकित कंपण्यात नौकरी करत आहे ! सदरील योजनेचा गरिबातील गरिब घटकांनी लाभ घ्यावा व सक्षम व्हावे ! असे आवाहन विभागामार्फत तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा प्रकल्प संचालक मीनल कुटे यांच्या मार्फत करण्यात येत आहे.