<
जळगाव – (प्रतिनिधी) – श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा वसुबारस निमित्ताने शहरातील दिव्यांग बांधवांना फराळ वाटप कार्यक्रम दिनांक २१/१०/२०२२शुक्रवार रोजी सायंकाळी ६ वाजता हरिविठ्ठलनगर व्यंकटेश कॉलनी इच्छेवर महादेव मंदिर जळगाव येथे उत्साहात संपन्न झाला.
सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा श्री चंद्रकांत गवळी साहेब (अप्पर पोलिस अधीक्षक जळगाव)
मा श्री किशोरजि भोसले. (उपाध्यक्ष सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ ) मा श्री अमितजी भाटिया (सदस्य सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ) डॉ श्री भरत सर गायकवाड( संचालक रेड प्लस ब्लड बँक जळगाव )
मा श्री देवेंद्रजी भावसार जिल्हामंत्री विश्व हिंदू परिषद जळगांव इतर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे यांच्याहस्ते गो मातेची आरती व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यानंतर उपस्थित .दिव्यांग बांधवांना फराळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला .
त्यावेळी मा श्री चंद्रकांत गवळी साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की दिवाळी हा सण हिंदू धर्मियांमध्ये नव्हे तर सर्व धर्मीयांचे लोक मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करीत असतात.
परंतु समाजातील अशा काही व्यक्तींवर निसर्गाने वा समाजाने अन्याय म्हणता येईल असे काही त्यांचे बाबतित घडले असते अशा व्यक्ती प्रति सहानुभूती म्हणून श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे संस्थापक दीपक जी दाभाडे व त्यांचे प्रतिष्ठान यांनी हा कार्यक्रम आयोजित केला .त्यामुळे त्यांचे मी सर्वप्रथम मनापासून आभार मानतो .
कारण स्वत साठी तर सर्व जण जीवन जगत असतात काबाडकष्ट करून झटत असतात परंतु समाजातील झटणार्या व्यक्तींचा हेतू हा उदात्त असतो व त्याचेच हे उदाहरण म्हणावे लागेल .या व्यतिरिक्त उपस्थित स्टेजवरील मान्यवर हेसुद्धा समाजासाठी काम करीत असल्याचे आम्ही मागील दोन वर्षांपासून बघत आहोत .
यावेळी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार श्री रावसाहेब देवरे श्री विजय राजपूत श्री दिनेश खारकर श्री जितेंद्र दाभाडे यांनी गोमातेची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन केला.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. धन्वंतरी देवरे हिने केला तर आभार प्रदर्शन श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे संस्थापक श्री दीपकजी दाभाडे यांनी करुन कार्यक्रमास यशस्वितेसाठी सर्वस्वी दीपक ठाकूर .किसन मेथे . राहुल परकाळे .राजू तडवी .संदीप दाभाडे . श्री देवर. साई पाटील.रूपेश मिस्त्री यांनी परिश्रम घेतले.