Tuesday, July 22, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महिला सबलीकरण काळाची गरज-नंदा केशवराव बोरसे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/10/2022
in लेख
Reading Time: 1 min read

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला:क्रिया:।।


श्री शंकर भगवान यांच्यातूनच शिवशक्तीचे रूप प्रगट झाले असे सांगतात.शक्ती माता आपल्या विविध रूपात भक्तांना दर्शन देते.आदिशक्ती अंबाबाई,कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी माता,माहूर गडाची रेणूका माता,वणीची सप्तशृंगी माता,असे विविध रूपे घेऊन दुष्टांचा, राक्षसांचा व अवगुणांचा नाश केला. नेहमी म्हणतात सत्याचाच विजय होतो,पण त्याला वेळ लागतो.लवकर सुख कधी मिळेल? या लोभापायी आपणअवगुण लगेच आत्मसात करतो. त्यामुळे दोष,लोभ,मत्सर,हेवा, शत्रुत्व,स्रियांवरील अत्याचार,अति हव्यासापोटी हिंसा निर्माण होतात.त्यामुळे मनुष्य अवगुणांच्या अधीन पटकन जातो. सहनशील वृत्ती, सामंजस्य,स्वयंशिस्त प्रत्येक व्यक्तीने अंगी बाणली तर चांगले गुण निर्माण होऊन उत्तम समाज निर्मिती होऊ शकते श्री.मा.मालोजीराजे भोसले यांनी वेरुळ येथे घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला.ते दररोज सकाळ -संध्याकाळ मंदिरात दिवा लावत. त्यांची ही सेवा वाया गेली नाही,त्यांच्या वंशात जिजामातेच्या उदरात छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला.

जिजामातेनेआपल्या वडिलांची श्री. लखुजी जाधव यांची हत्या दरबारात झाली आणि त्या चवताळून उठल्या व त्यांनी निश्चय केला व जिद्द,चिकाटीने सर्वगुणसंपन्न शिवबांना तयार करून रयतेला सुखी केले.छत्रपती शिवाजी महाराजांनी चांगले गुण पारखून मावळे गोळा करून स्वराज्य निर्माण केले. श्री.मा.सुभेदार मल्हारराव होळकर व पुण्यश्लोक अहिल्याबाई यासुद्धा शिवशंभु यांचे निस्सीम भक्त होते. सुभेदार मल्हारराव होळकर यांनी सुद्धाअहिल्याबाईंचे गुण पारखून स्वतःची सून करून घेतली व मावळ प्रांत इंदोर यांचा विकास केला. ज्योतिराव फुले यांनीही त्याकाळी स्त्रियांना कोणतेही स्वातंत्र्य नसतांना व त्यांना अबला समजुन अत्याचार करणाऱ्या समाजाला धडा शिकवण्यासाठी पत्नीला विश्वासाने शिक्षणाचा मार्ग दाखवला. त्यांनी मुलींचे शिक्षण सुरू करून नवसमाज निर्मिती केली.मुलींना समाजात पक्षांप्रमाणे स्वच्छंद फिरण्यास व स्वाभिमानाने जगण्यास प्रेरणा दिली प्रत्येक स्त्रीला जर सबला समजले तर नक्की परिवर्तन घडू शकते.जिद्द, चिकाटी,सातत्य,जबाबदारी स्वीकारण्याची मनोवृत्ती स्त्रीमध्ये जास्त असते,कोणतेही कार्य तडीस नेणे ही कला तिला अवगत असते. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. शिक्षण मनापासून घेतल्याने आपल्या जीवनात जे प्रश्न निर्माण होतात त्यांचे उत्तर शिक्षणातच आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनीने तळमळीने व जागरूकतेने शिक्षण घेतले पाहिजे. मनअसे सक्षम केले पाहिजे की वाईट गोष्ट घडायला नको व वाईट विचारांचा परिणाम मनावर व्हायलाच नको.खरं तर हे विश्वचं एक कुटुंब आहे.पृथ्वी बाहेर माणूसच नाही.या पृथ्वीवरच देव आहेत,जर सर्व देव व माणूस मिळून कुटुंब झाले तर त्याच्या पलीकडे काय? हे माहित नाही.यांच्या पलीकडे कोणीही मोठा शत्रू नाही.आपल्यालाच पृथ्वीवर जगायचे व मरायचे आहे. सर्वच नाशिवंत आहे,पण सर्वांचा अवधी वेगवेगळा या पृथ्वीवरून हिंसा, शत्रुत्व, क्रोध,द्वेष,मत्सर,हेवा,लोभ, स्त्रियांचा छळ, खोटे बोलणे,चोरी या रावणाचा वध झाला तर प्रामाणिक,स्वयंशिस्त,बंधुत्व,स्त्रियांना आदर, इमानदार,मर्यादापुरुषोत्तम रामासारखे सत्य उदयास येऊन समाजाची परिवर्तन सती युगात होईल यात शंकाच नाही.

श्रीमती.नंदा केशवराव बोरसे, उपशिक्षिका,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्हे खुर्द ता.अमळनेर जि. जळगाव
मो.नं.7875077873

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात पाडवा पहाट संपन्न

Next Post

के सी ई आय एम आर मध्ये “स्वावलंबी भारत कार्यशाळा

Next Post

के सी ई आय एम आर मध्ये "स्वावलंबी भारत कार्यशाळा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

Private:

माध्यमिक शिक्षण विभागाला माहिती अधिकार कायद्याचा विसर – ॲड. दिपक सपकाळे

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Private:

दहिगाव ग्रामपंचायत कडून माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications