<
ज्येष्ठ नागरिक संघ लोहारा व आजीवन अध्ययन व विस्तार विभाग जळगाव यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य आणि कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न
लोहारा ता. पाचोरा – ( ईश्वर खरे) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आजीवन अध्ययन व विस्तार विभाग जळगाव व ज्येष्ठ नागरिक संघ लोहारा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य आणि कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय प्रांगण लोहारा येथे घेण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य आणि कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन मा.प्रा.डॉ.अनिल चिकाटे संचालक ज्ञानस्रोत केंद्र क. ब.चौ.उ.म.वि.जळगाव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून मा.प्रा.डॉ.आशितोष पाटील हे होते, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय जगतराव बारकू पाटील अध्यक्ष खानदेश प्रादेशिक विभाग धुळे हे होते.प्रमुख अतिथी मा.,मा. सरपंच अक्षयकुमार जेस्वाल,मा.सतीशचंद्र काशीद,बी.एन.पाटील,मा. आबासाहेब भी.शा.शेळके, मा.एस.बी.महाजन, मा.डी.टी.चौधरी,मा.जगदीश झांजरिया , विघ्नहर्ता हॉस्पिटल चे संचालक डॉ. भूषण मगर, ज्येष्ठ पत्रकार कृष्णराव शेळके, महेंद्र शेळके,ईश्वर खरे, गजानन क्षीरसागर, रमेश शेळके इत्यादी.हे पाहुणे उपस्थित होते.
२०० ज्येष्ठ नागरिकानी मोफत आरोग्य तपासणी घेतला लाभ ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या वयाबरोबर शरीराच्या पण तक्रारी वाढत असतात त्यामुळे त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते या शिबिरामध्ये विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल पाचोरा यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी केली गेली.त्या ठिकाणी डायबिटीस, हृदयरोग , आयुर्वेदिक, दंतरोग, तपासणी केल्या गेल्या. उपचारासाठी तज्ञ वैद्यकीय मार्गदर्शक म्हणून विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर भूषण मगर, चेस्ट जनरल फिजिशियन. डॉ. देवेंद्र कोठांगडे,अस्थिरोग तज्ञ
डॉ.इम्रान पिंजारी,मधुमेह व हृदयरोग तज्ञ
डॉ.महेंद्र गीते,दंतरोग तज्ञ. डॉ.विकास पालीवाल,
आयुर्वेद तज्ञ व विघ्नहर्ता हॉस्पिटलची संपूर्ण टीम यांनी उपचार केले.
या आरोग्य आणि कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरापुरे सर यांनी केले, प्रस्तावना ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भास्कर आंबिकार यांनी केले. व आभार प्रदर्शन ज्येष्ठ नागरिक संघाचे कोषाध्यक्ष श्री प्रभाकर चौधरी यांनी केले.