<
एकलव्य’च्या खेळाडूंचे वर्चस्व
जळगाव दि.10- 22 व्या एरोबिक जिम्नॅस्टिक्स राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची निवड चाचणी स्पर्धा दिनांक 7 नोव्हेंबर 2022 रोजी केसीई सोसायटी संचालित एकलव्य क्रीडा संकुल येथे घेण्यात आली. सदर राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा ही दिनांक 12 व 13 नोव्हेंबर 2022 दरम्यान डेरवण, जिल्हा रत्नागिरी येथे महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या मान्यतेने होणार आहेत.
या स्पर्धेमध्ये केसीई सोसायटीच्या एकलव्य क्रीडा संकुलातील एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमीमध्ये सराव करणाऱ्या 13 खेळाडूंची निवड जाहीर करण्यात आली. हा संघ या स्पर्धेमध्ये विविध वयोगटांमध्ये सहभागी होणार आहे. या संघासोबत प्रा. निलेश जोशी यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या यशाबद्दल केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे, प्राचार्य डॉ. अशोक राणे, क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, जळगाव जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटना सचिव प्रवीण पाटील, अक्षय सोनवणे तसेच पालकांनी खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.
निवड झालेले खेळाडू:
नॅशनल डेव्हलपमेंट गट-
आयुष वंजारी (पुरुष एकेरी)
माही फिरके (महिला एकेरी)
आयुष वंजारी व माही फिरके (मिश्र दुहेरी)
आयुष वंजारी, अवंतिका महाजन व सोमेश्वर धांडे (मिश्र तिहेरी)
सब ज्युनिअर गट-
कैवल्य जोशी (पुरुष एकेरी)
नमित दळवी (पुरुष एकेरी)
कृष्णाई रेंभोटकर (महिला एकेरी)
आयूषी मिश्रा (महिला एकेरी)
कैवल्य जोशी व अनुष्का चौधरी (मिश्र दुहेरी)
नमित दळवी व पुष्टी सोगथी (मिश्र दुहेरी)
अनुष्का चौधरी, साची इंगळे व गायत्री देशपांडे (मिश्र तिहेरी)
नमित दळवी, आयूषी मिश्रा व पुष्टी सोगथी (मिश्र तिहेरी)
अनुष्का चौधरी, साची इंगळे, गायत्री देशपांडे, कृष्णाई रेंभोटकर व सिया राका (मिश्र समूह)