<
जळगाव : संविधान दिन ते प्रजासत्ताक दिनापर्यत जागर संविधानाचा उपक्रम राबविण्याचा निर्णय संविधान जागर समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
शहरातील पद्मालय शासकीय विश्रामगृहात संविधान गौरव रॅली च्या नियोजनासाठी विविध संस्था व संघटनाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संविधान जागर समितीचे मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे होते.
२६ नोव्हेंबर संविधान दिनापासून ते २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापर्यंत “जागर संविधानाचा” या उपक्रमांतर्गत संविधान रॅली, व्याख्यानमाला, कवी संमेलन, परिसंवाद, संविधानाची माहिती देणारा चित्ररथ आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
बैठकीला मार्गदर्शन करताना मुकुंद सपकाळे म्हणाले, माणसाला माणूसपण देणाऱ्या भारतीय संविधानात भारतीयांना देण्यात आलेल्या हक्क, अधिकार, कर्तव्य यांची माहिती करून देण्याची आवश्यकता विशद केली.
प्रास्ताविक संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे यांनी केले. यावेळी झालेल्या चर्चेत छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, सरोजिनी लभाणे, विर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलीप सपकाळे,महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे सचिव हरिश्चंद्र सोनवणे , प्रा. प्रितीलाल पवार, प्रा.डॉ.सत्यजित साळवे, दिलीप अहिरे, मिलिंद सोनवणे आदींनी आपले विचार व्यक्त केले.
बैठकीत बापूराव पानपाटील, भरत कर्डिले, चंदन बि- हाडे, वाल्मीक सपकाळे, दिलीप त्र्यंबक सपकाळे, भिमराव सोनवणे, राजू मोरे, उदय पवार, नीलेश बोरा, गुलाबराव कांबळे, महेंद्र केदारे, भारत सोनवणे, समाधान सोनवणे, जयपाल धुरंदर, अरुण वाघ, सुभाष सपकाळे, जगदीश सपकाळे, संतोष सपकाळे, मल्हार खंडाळे यांच्यासह संविधान जागर समिती, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा,लोकसंघार्ष मोर्चा, छावा मराठा युवा महासंघ , प्रहार संघटना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.