<
जळगाव-(प्रतिनिधी) – दिनांक 14/11/2022 वार सोमवार रोजी बाल दिनाचे औचित्य साधून विश्व हिंदू परिषद जिल्हा सेवा विभागामार्फत समता नगर येथे संस्कार शाळेचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले.
सदर उद्घाटन प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सेवा प्रमुख डॉ.हितेंद्र युवराज गायकवाड , जिल्हा सह सेवा प्रमुख श्री. दिपक दाभाडे , विश्व हिंदू परिषदेचे धर्म प्रसार प्रांत उपाध्यक्ष श्री.धनंजयजी तिवारी , विश्व हिंदू परिषदेचे विशेष संपर्क प्रमुख श्री.ललितजि खडके , तसेच महानगर धर्म प्रसार प्रमुख श्री. हरिषजि कोल्हे , जिल्हा मंत्री श्री.देवेंद्रजी भावसार , महानगर सेवा प्रमुख श्री.बापू माळी , श्रीराम प्रखंड सेवा प्रमुख श्री.पवन कोळी , पंचमुखी हनुमान प्रखंड सेवा प्रमुख श्री.कुबेर जोशी आणि सौ.पूनम जोशी , दुर्गावाहिनी जिल्हा संयोजिका सौ.संध्याताई तिवारी , तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती रत्ना चौधरी मॅडम , समता नगर अंगणवाडी सेविका सुवर्णा पाटील मॅडम , संस्कार शाळा आचार्या सौ.वैशालीताई राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
जळगाव शहरात जुनी जोशी कॉलनी , लक्ष्मी नगर , शिवाजी नगर , सम्राट कॉलनी , गेंदालाल मील , जुने जळगाव , तानाजी मालुसरे नगर , कांचन नगर , खेडी , तुकाराम वाडी , ईश्वर कॉलनी या ठिकाणीही अशाच स्वरूपाच्या संस्कार शाळा जागा निश्चिती नंतर जळगाव शहरात येत्या महिनाभरात सुरू होणार अशी माहिती विश्व हिंदू परिषद जिल्हा सेवा विभागाचे प्रमुख डॉ.हितेंद्र युवराज गायकवाड यांनी दिली.
सदर संस्कार शाळा उद्घाटन प्रसंगी जिल्हा मंत्री श्री.देवेंद्र भावसार यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन केले. तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती रत्ना चौधरी मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
उपस्थित सर्व स्थानिक कार्यकर्त्यांचे आणि मान्यवरांचे आभार विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सह सेवा प्रमुख श्री. दिपक दाभाडे यांनी मानले.
स्वामी विवेकानंद संस्कार शाळेच्या उद्घाटनाचे संपूर्ण नियोजन हे बाळा सोनार , श्री.गणेश ठाकूर बापू माळी , पवन कोळी यांनी केले.