<
एरंडोल – (प्रतिनिधी) – दिनांक 14 नोहेंबर वार सोमवार रोजी भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार तहसील कार्यालय एरंडोल व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी नाशिक विभाग शिक्षक पदवीधर मतदार संघात नाव नोंदणी कश्या – प्रकारे करावी. त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पदवीचे प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, आधार ओळखपत्र, पासपोर्ट फोटो हे आपल्याकडे असेल तरच आपण नोंदणी करु शकतो.
लोकशाहीमध्ये मतदान ओळखपत्राला आधार ओळखपत्र लिंक करणे. किती आवश्यक बाब आहे हे केल्याने जे दुबार(बोगस) मतदार आहेत ते बाहेर येतील आणि मतदानात पारदर्शकता निर्माण होईल. आणि त्यातून योग्य उमेदवार निवडला जाईल असे लोकांना पटवून दिले याविषयावर मतदान जनजागृती मोहीम तालुक्यातील विविध ठिकाणी शहरात व गावात राबविण्यात आली. त्यामध्ये एरंडोल शहरामधील तहसील कार्यालय डी.डी.एस.पी. महाविद्यालय, बस स्थानक, शिवाजी महाराज स्मारक तसेच कासोदा, उत्राण अशा विविध ठिकाणी पथनाट्यच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. हा कार्यक्रम एरंडोल तहसील कार्यालय, निवडणूक शाखा यांच्या मार्फत आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी:- वैशाली सुरवाडे, ज्योती कोळी, रोहन महाजन, योगेश माळी, प्रविण देशमुख, प्रशिक तायडे, जयेश साळुंखे यांनी तालुक्यात विविध ठिकाणी जनजागृती केली. यावेळी एरंडोल तालुक्याच्या तहसीलदार सौ. सुचिता चव्हाण मॅडम देखील उपस्थित होत्या. त्यांनी सहभागी विद्यार्थांचे कौतुक केले.